'सलमान सोसायटी' सिनेमाचे ​'पार्टी दणाणली' गाण्याचे रेकॉर्डिंग झाले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 16:03 IST2018-06-28T15:58:18+5:302018-06-28T16:03:50+5:30

सोनू सूदला मराठी सिनेमावर विशेष प्रेम आहे. त्याने याबाबत कायम जाहीर कबुली दिली आहे.त्यामुळेच सोनू सूद या सिनेमात एखादी भूमिका साकारणार का याची उत्सुकता आहे.

 Record of 'Salman Society' song 'Party Mental' has been completed | 'सलमान सोसायटी' सिनेमाचे ​'पार्टी दणाणली' गाण्याचे रेकॉर्डिंग झाले पूर्ण

'सलमान सोसायटी' सिनेमाचे ​'पार्टी दणाणली' गाण्याचे रेकॉर्डिंग झाले पूर्ण

बॉलीवुडच्या कलाकारांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी रसिक वाट्टेल ते करायला तयार असतात. सर्वसामान्य रसिकांसह बड्या निर्मात्यांनाही कलाकारांच्या नावाची भुरळ पडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कलाकारांच्या नावाचा वापर करुन सिनेमाला शीर्षक देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. यांत आणखी एका अशाच सिनेमाची भर पडली आहे.. सलमान सोसायटी असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा सलमान खानशी काहीही संबंध नाही. दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या ​या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला होता. सोनू सूदला मराठी सिनेमावर विशेष प्रेम आहे. त्याने याबाबत कायम जाहीर कबुली दिली आहे.त्यामुळेच सोनू सूद या सिनेमात एखादी भूमिका साकारणार का याची उत्सुकता आहे.

 पढेगा इंडिया ​तो बढेगा इंडिया' अशी टॅगलाइन असलेला हा सिनेमा बाल शिक्षणासारख्या विषयावर भाष्य करणारा असणार आहे​ . या सिनेमात रसिकांना कॉमेडीचा तडकाही अनुभवायला मिळणार आहे.या सिनेमाच्या निर्मिती ची धुरा निर्माते दशरथ यादव, रेखा सुरेंद्र जगताप ,संपतराव पाटिल आणि शांताराम भोंडवे, संयुक्त पणे प्राजक्ता इंटरप्राइजेस सोबत सांभाळत आहेत.

​पार्टी म्हणजे धमाल , मज्जा मस्ती आणि बच्चे पार्टी असली की पार्टी दणाणुन सोडतात , एक असेच धमाल पार्टी सॉन्ग लवकरच प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे , सलमान सोसायटीच्या  "पार्टी दणाणली" या पहिल्या गाण्याचे रिकॉर्डिंग पार पडले.रिकॉर्डिंग वेळी सिनेमातील सर्व बालकलाकार उपस्थित असून रिकॉर्डिंगच्या वेळी धमाल मस्ती केलीच तसेच त्यांना हे गाणं भरपूर आवडले असून बच्चे कंपनी आत्ताच डांस प्रैक्टिला लागलेत.ह्या वेळी सिनेमाचे निर्माते ही आनंदित दिसले त्यांनी आशा व्यक्त केली की  "पार्टी दणाणली" हे गाणं प्रत्येक पार्टीमध्ये आणि इतर कार्यक्रमात धमाल करेल. 

सिनेमाचे म्यूजिक 'गावठी'' चित्रपट फेम संगीत दिग्दर्शक श्रेयश अंगने ने दिले असून नागेश मोर्वेकर (गावठी चित्रपट फेम) यांनी आपल्या आवाजाने आणखी धमाकेदार केले आहे'. रसिकांना हा सिनेमा पाहण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.येत्या डिसेंबर 2018 हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे समजतंय.
 

Web Title:  Record of 'Salman Society' song 'Party Mental' has been completed