"मराठीत माधुरी दीक्षित नाहीये...", असं का म्हणाले रवी जाधव? आगामी सिनेमाशी आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:46 IST2026-01-08T14:45:31+5:302026-01-08T15:46:10+5:30

रवी जाधव नेमकं काय म्हणाले?

ravi jadhav talks about upcoming film phulwara says there is no madhuri dixit in marathi industry | "मराठीत माधुरी दीक्षित नाहीये...", असं का म्हणाले रवी जाधव? आगामी सिनेमाशी आहे कनेक्शन

"मराठीत माधुरी दीक्षित नाहीये...", असं का म्हणाले रवी जाधव? आगामी सिनेमाशी आहे कनेक्शन

'नटरंग', 'टाईमपास' असे सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आगामी सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. 'नटरंग'नंतर आता ते पुन्हा एक तमाशापट घेऊन येत आहेत. दिवाळीत त्यांनी 'फुलवरा' या सिनेमाची घोषणा केली. या सिनेमाबद्दल अपडेट  देताना त्यांनी कास्टिंगवर भाष्य केलं. मराठी इंडस्ट्रीत माधुरी दीक्षित नाहीये असं वक्तव्य त्यांनी केलं. यामागचं कारण काय वाचा.

अमोल परचुरेंच्या 'कॅचअप' युट्यूब चॅनलला मुलाखत देताना रवी जाधव म्हणाले, "मी एप्रिलमध्ये फोक आख्यान पाहिलं होतं. ती सगळी २४-२५ वयातील तरुण मुलं आहेत. त्या सगळ्यांनी मिळून तो अप्रतिम लोकसंगीताचा थाट आपल्यासमोर उभा केला होता. तो पाहिल्यावर मी खूप भारावलो. मला असं वाटलं की २०१० मध्ये मी जे नटरंग मध्ये दाखवलं होतं त्यानंतर आता परिस्थिती काय आहे? आताच्या काळासाठीही एक तमाशापट करावा असं मला सुचलं.  कारण नटरंग मधली कथा ही १९७० च्या काळातील होती. मग आत्ता २०२६ मध्ये नक्की काय घडतंय यावर काहीतरी करु शकतो का असं मला सुचलं. संकल्पना तयार केली. त्यानंतर मी फोक आख्यान ज्याने लिहिलंय त्या ईश्वर अंधारेला भेटलो. त्यांच्या संगीत दिग्दर्शकालाही भेटलो. त्यांना ही संकल्पना सांगितली. त्यांना खूप आवडलं. यावर काहीतरी खूप छान होऊ शकतं असंच त्यांचं म्हणणं होतं. कारण लोकसंगीत जे लोप पावत चाललं आहे ते आपण परत कसं जिवंत करु शकतो हाच त्यांचाही प्रयत्न आहे. त्यामुळे आमचे विचार जुळले."

ते पुढे म्हणाले,"मे मध्ये मी लिहायला सुरुवात केली. दिवाळीआधी पहिला ड्राफ्ट थोडा तयार झाला तेव्हा मी ठरवलं की आता सिनेमाची घोषणा करुया. तेवढं काम झालं नसतं तर मी घोषणाही केली नसती. सिनेमाचं मूळ ही कथा-पटकथा आहे. त्यावरच सगळा डोलारा उभा राहतो. तेच जर कमजोर असेल तर काहीच उपयोग नसतो. त्यामुळे मी आधी फाऊंडेशन पक्कं करायचं ठरवलं. म्हणून मी एक वर्षाचा काळ घेतला की पुढच्या दिवाळीत मी ते रिलीद करेन असं ठरवलं. आता प्री-प्रोडक्शन, कास्टिंग या प्रक्रिया सुरु होतील."

कोण होणार 'फुलवरा'?

रवी जाधव म्हणाले, "मी स्वत:च कास्टिंगमध्ये खूप गोंधळलो आहे. कारण आपल्या मराठीत माधुरी दीक्षित नाहीये..जी अप्रतिम नृत्य करतै आणि उत्कृष्ट अभिनयही करतात. असं दोन्ही चांगलं करणारे आपल्याकडे कोणी नाही. एखादी नृत्य छान करते पण अभिनयात कमजोर असते. कोणी अभिनय उत्तम करतात पण नृत्य येत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगतो मी यासाठी शोध घेत आहे. काहींना स्वत:हून अप्रोचही करत आहे. काहींचे रील बघतोय, त्यांचे जुने चित्रपट पाहतोय. जर कोणाला वाटत असेल की मी अप्रतिम नृत्य करते, अभिनयही करते तर त्यांनी कृपया स्वत:हून पुढे या. नटरंग पुन्हा घडणं अशक्य आहे तसंच खूप काळापर्यंत टिकेल असं काहीतरी करायचं आहे. फुलवरा हा नटरंग नाही तर वेगळं आहे आताचं आहे. डोळ्यात अंजन घालणारं काहीतरी हे असणार आहे."

Web Title : रवि जाधव को 'फुलवारा' की तलाश: मराठी माधुरी दीक्षित की कमी

Web Summary : निर्देशक रवि जाधव की 'फुलवारा' फिल्म के लिए कलाकार ढूंढना मुश्किल है। जाधव को एक ऐसी अभिनेत्री चाहिए जो नृत्य और अभिनय दोनों में माहिर हो। उन्होंने कहा कि मराठी में माधुरी दीक्षित जैसी प्रतिभा की कमी है और वे सक्रिय रूप से तलाश कर रहे हैं।

Web Title : Ravi Jadhav seeks 'Phulwara': Marathi Madhuri Dixit missing, he says

Web Summary : Director Ravi Jadhav's 'Phulwara', a new Tamasha film, faces casting challenges. Jadhav seeks a lead who excels in both dance and acting, lamenting the absence of a Marathi Madhuri Dixit for the role. He is actively searching for talent.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.