अशोक सराफ अन् लक्ष्मीकांत बेर्डेंनी सुरु केलं होतं रॅप सॉन्ग; 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' मधील हा सीन आठवतो का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 17:57 IST2023-05-02T17:56:34+5:302023-05-02T17:57:13+5:30
Ashok Saraf and Laxmikant berde: लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जणू जोडगोळीच होती.या दोन्ही कलाकारांनी एकत्रितपणे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

अशोक सराफ अन् लक्ष्मीकांत बेर्डेंनी सुरु केलं होतं रॅप सॉन्ग; 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' मधील हा सीन आठवतो का?
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडगोळी म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ (Ashok Saraf and Laxmikant berde) . या दोघांनी ९० च्या काळात अनेक सुपरहिट सिनेमे दिले. आजही त्यांचे सिनेमा, डायलॉग्स, अभिनय प्रेक्षकांमध्ये चर्चिला जातो. यामध्येच सध्या सोशल मीडियावर त्यांच्या गाजलेल्या 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' या सिनेमातील एक सीन चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे हा सीन पाहून या जोडीनेच मराठीत पहिल्या रॅप सॉन्गचा शोध लावलाय असं नेटकरी म्हणत आहेत.
सध्या सोशल मीडियावर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा बाळाचे बार ब्रह्मचारी या सिनेमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मित्राच्या पत्नीला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी ही जोडी प्लॅन करते. या प्लॅनविषयी बोलत असतानाच त्यांना ते पद्यात या ओळी पुन्हा पुन्हा गुणगुणतात. त्यामुळे हा रॅप असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जणू जोडगोळीच होती.या दोन्ही कलाकारांनी एकत्रितपणे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यात अफलातून, अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, शेजारी-शेजारी या सिनेमांचा समावेश आहे.