प्रियांका बर्वेसोबत बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध गायकाने गायलेलं ‘अशी ही आशिकी’चे टायटल ट्रॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 15:00 IST2019-01-23T14:56:49+5:302019-01-23T15:00:11+5:30
‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या रोमँटिक गाण्यातून स्वयम आणि अमरजा करणार त्यांची आशिकी व्यक्त आणि आजपासून आपणही आपल्या स्पेशल व्यक्तीला हे गाणं डेडिकेट करु शकतो.

प्रियांका बर्वेसोबत बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध गायकाने गायलेलं ‘अशी ही आशिकी’चे टायटल ट्रॅक
आपण कोणावर दिलखुलासपणे आणि वेड्यासारखं प्रेम केलं असेल, तर अशी ही आशिकी एक्सप्रेस करायला जर रोमँटिक गाण्याची साथ मिळाली तर सर्व किती लव्हेबल होऊन जाईल ना...! ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या रोमँटिक गाण्यातून स्वयम आणि अमरजा करणार त्यांची आशिकी व्यक्त आणि आजपासून आपणही आपल्या स्पेशल व्यक्तीला हे गाणं डेडिकेट करु शकतो. कारण गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाचे टायटल ट्रॅक नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
स्वयम आणि अमरजा यांच्या आशिकीवर आधारित ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या रोमँटिक गाण्याचे शूट स्वित्झर्लंडमधील ‘आरोसा’ या ब्युटिफूल आणि रोमँटिक हिल स्टेशन असलेल्या लोकेशनवर करण्यात आले. स्वयम आणि अमरजाच्या आशिकीच्या निमित्ताने आरोसामध्ये पहिल्यांदाच गाण्याचे शूट झाले असून या गाण्याचं चित्रीकरण पाहिल्यावर एका गोष्टीची कल्पना येते की आपल्या मराठी चित्रपटाचं गाणं बॉलिवूडला टक्कर देण्यासारखं शूट झालं आहे.
लोकेशनसह, सोनू निगम आणि प्रियांका बर्वे यांनी या गाण्याला दिलेला आवाज, सचिन पिळगांवकर यांचं हटके आणि ऐकता क्षणीच आवडेल असे म्युझिक आणि अभिषेक खानकर यांनी लिहिलेले रोमँटिक शब्द हे या गाण्याचे मुख्य हायलाईट्स सर्वांना पुन्हा एकदा हमखास प्रेमात पाडणार.
बेभरोशी थोडी, बेहिशोबी थोडी, सिंपल थोडीशी अशी अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळेची ‘अशी ही आशिकी’ची निर्मिती मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे ही या चित्रपटाचे निर्माते आहेत. हवी-हवीशी, लव्ही डव्हीशी ‘अशी ही आशिकी' १४ फेब्रुवारीला सर्वांच्या भेटीस येतेय.