"सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून पुढे आलेल्या...", मुख्यमंत्र्यांसाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 14:55 IST2024-02-09T14:52:43+5:302024-02-09T14:55:41+5:30
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रविण तरडेंनी खास पोस्ट शेअर केली आहे.

"सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून पुढे आलेल्या...", मुख्यमंत्र्यांसाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट
प्रविण तरडे हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबरच प्रवीण तरडे त्यांच्या बेधडक स्वभावामुळेही ओळखले जातात. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रविण तरडेंनी खास पोस्ट शेअर केली आहे.
एकनाथ शिंदेंच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त प्रविण तरडेंनी त्यांच्याबरोबरचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत प्रविण तरडे, एकनाथ शिंदे आणि मंगेश देसाई दिसत आहेत. एका तरुणाच्या शेतातील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत प्रविण तरडे आणि शिंदे तरुणाला शेतीबद्दल सल्ले देताना दिसत आहेत. त्यानंतर पुढे तरडे आणि शिंदे शेतात मशागत करतानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत तरडेंनी शिंदेंना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
"मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब...तुमच्या आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून पुढे आलेल्या असामान्य माणसाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा," असं कॅप्शन त्यांनी पोस्टला दिलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही करत एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.