Pravin Tarde New Movie : प्रवीण तरडेंचा नवा मराठी सिनेमा य़ेतोय भेटीला, दमदार व्हिडीओमुळे उत्सुकता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 00:11 IST2022-01-21T00:07:23+5:302022-01-21T00:11:54+5:30
Pravin Tarde New Movie : प्रवीण तरडे यांनी त्यांच्या अजून एका आगामी मराठी चित्रपटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र तरडे यांनी या चित्रपटाचे नाव सांगितलेलं नाही. प्रवीण तरडे यांनी हा २६ सेकंदांचा व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला आहे.

Pravin Tarde New Movie : प्रवीण तरडेंचा नवा मराठी सिनेमा य़ेतोय भेटीला, दमदार व्हिडीओमुळे उत्सुकता वाढली
मुंबई - प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक प्रवीण तरडे हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसाठी ओळखले जातात. सध्या त्यांच्या आगामी सरसेनापती हंबिरराव या चित्रपटाबाबत मराठी सिनेविश्वात चर्चा आहे. त्यातच आता प्रवीण तरडे यांनी त्यांच्या अजून एका आगामी मराठी चित्रपटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र तरडे यांनी या चित्रपटाचे नाव सांगितलेलं नाही.
प्रवीण तरडे यांनी हा २६ सेकंदांचा व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दंगलसदृश परिस्थिती दिसत असून, एका गाडीमध्ये स्फोट होताना दिसत आहे. त्यामुळे प्रवीण तरडेंचा हा आगामी चित्रपट नेमका कोणत्या स्फोटक घटनेवर आघारित आहे, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, प्रवीण तरडे यांनी आतापर्यंत देऊळ बंद, मुळशी पॅटर्न या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच प्रवीण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव या त्यांच्या आगामी चित्रपटाबाबत रसिकांमध्ये उत्सुकता आहे.