प्रशांत दामलेंचा १३,३०० वा प्रयोग! संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, म्हणतो- "गेल्या तीन पिढ्यांचं मनोरंजन करणारं मराठी वैभव..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:15 IST2025-09-12T12:14:09+5:302025-09-12T12:15:24+5:30

अभिनेते प्रशांत दामलेंबद्दल संकर्षण कऱ्हाडेने लिहिलेली खास पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे

Prashant Damle 13,300th natak prayog Sankarshan Karhade post viral | प्रशांत दामलेंचा १३,३०० वा प्रयोग! संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, म्हणतो- "गेल्या तीन पिढ्यांचं मनोरंजन करणारं मराठी वैभव..."

प्रशांत दामलेंचा १३,३०० वा प्रयोग! संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, म्हणतो- "गेल्या तीन पिढ्यांचं मनोरंजन करणारं मराठी वैभव..."

 संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षणने नुकतीच अभिनेते प्रशांत दामलेंबद्दलची एक खास पोस्ट लिहिली आहे. प्रशांत दामले आज रंगभूमीवर तब्बल १३ हजार ३०० वा प्रयोग करत आहेत. हा एक रेकॉर्डच म्हणता येईल. संकर्षणने प्रशांत दामलेंचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. तो लिहितो, ''आज आमच्या दामले सरांचा वैयक्तीक १३,३०० वा प्रयोग आहे … “ते रा ह जा र ति न शे” वा प्रयोग … म्हणजे काय झाले हो…? एका प्रयोगाचे ३ तास जरी म्हणलं तरी आयुष्याचे ३९,९०० तास स्टेजवर आहे हा माणूस … त्याच ऊर्जेने.. आता तुम्ही म्हणाल व्यवसाय आहे त्यांचा… त्याचे पैसे मिळतात त्यांना … मान्यंच आहे …''

संकर्षण पुढे लिहितो, * पण ३८ वर्षं कुठल्याही व्यवसायात किंवा मनोरंजनाच्या व्यवसायांत कधीही कंबरेखालचे विनोद नं करता, नाटकाशी , नाटकाला आलेल्या प्रेक्षकांशी प्रामाणीक राहून , काम करणं सोप्पं नाही हो…
* नट म्हणून समोरच्या नटाचा विनोद न मारता त्याचाही हूरूप वाढवणं, समोरच्या नटाच्या विनोदालाही मोठं करणं फार फार अवघड आहे …
* निर्माता म्हणुन तरुण पोरांच्या पाठीशी ऊभं रहाणं हे ही सोप्पं नाही… माणूस म्हणुन पडत्या काळांत रंगमंच कामगारांचं स्वखर्चाने घर भरणं हे तर त्याहून सोपं काम नाही…
* महाराष्ट्र नाही भारतभर … भारत नाही तर जगभर जिथे जिथे म्हणुन मराठी लोक रहातात तिथे तिथे जाऊन “प्रयोग” करणं , तिथल्या माणसांना नाटकाशी जोडून ठेवणं कित्ती अवघड…
* मी त्या क्षेत्रांत फारंच नवा आहे … पण लाख्खो किलोमिटरचा प्रवास , जागरणं करुन , न थकता , न कंटाळता एका प्रयोगात ३ तास फ्रेश दिसणं कित्ती अवघड आहे हे कळलंय मला…
* पण हा माणुस वयाच्या ६४ व्या वर्षी आम्हाला लाजवेल असा ऊभा आहे हे कमाल आहे …




“माणुस नसताना त्याची किंमत करण्यापेक्षा तो असताना त्याचं मोल कळणं फार आवश्यक असतं…” पण ३ पिढ्यांचं रंगमंचावरून मनोरंजन करणारं हे मराठी वैभव आपल्या महाराष्ट्रांत आहे हे आपणच मिरवणं हे फार महत्वाचं आहे … नाही का …??? खूप शुभेच्छा Prashant Damle सर …  तुम्ही फार मौल्यवान आहात !!!  (Post च्या background ला असलेलं गाणं त्यांचं Fav आहे…)'', अशाप्रकारे संकर्षण कऱ्हाडेने पोस्ट लिहून प्रशांत दामलेंचं अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Prashant Damle 13,300th natak prayog Sankarshan Karhade post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.