मराठमोळी प्राजक्ता माळीनं घेतली बॉलिवूड सुपरस्टार गोविंदाची भेट! फोटो शेअर करत म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 15:43 IST2024-02-18T15:42:37+5:302024-02-18T15:43:06+5:30

नुकतेच प्राजक्ताने अभिनेता गोविंदाची भेट घेतली.

Popular Marathi actress meet bollywood superstar govinda actress shares photo | मराठमोळी प्राजक्ता माळीनं घेतली बॉलिवूड सुपरस्टार गोविंदाची भेट! फोटो शेअर करत म्हणाली…

मराठमोळी प्राजक्ता माळीनं घेतली बॉलिवूड सुपरस्टार गोविंदाची भेट! फोटो शेअर करत म्हणाली…

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. नेहमीच ती तिच्या हटके फोटोंनी अनेकांना घायाळ करते. यातच तिच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. नुकतेच प्राजक्ताने अभिनेता गोविंदाची भेट घेतली.

प्राजक्ताने सोशल मीडियावर गोविंदाच्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. गोविंदा यांना भेटून आनंद झाल्याचं तिनं पोस्टमध्ये म्हटलं. या फोटोंमध्ये प्राजक्ता गोविंदाशी गप्पा मारताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले 'तू आली तेव्हा मंदिरात होतो आम्ही. खूप स्तुती केली जात होती लोकांकडून. विशेष हास्य जत्रा बघणाऱ्या लोकांकडून'. तर आणखी एकाने लिहलं, 'अरे वा हिरो नंबर १ बरोबर आमच्या महाराष्ट्राची क्रश नंबर १...दुग्ध शर्करा योग'. याशिवाय काही चाहत्यांनी खूप गोड, छान अशा कमेंट केल्या आहेत. 

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर मालिका, चित्रपट, वेबसीरिजमधून प्राजक्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘तीन अडकून सिताराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटात तिच्याबरोबर वैभव तत्त्ववादी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्राजक्ताची ‘रानबाजारी’ ही वेबसीरिजही प्रचंड गाजली. 

 प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करतेय. प्राजक्ताच्या नवीन सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. तर फक्त अभिनेत्री नसून आता तिनं उद्योजिका म्हणून नवं काम सुरू केलं आहे. तिचा प्राजक्तराज हा तिचा दागिन्यांचा ब्रँड आहे. यातून ती दागिन्यांची आवड असणाऱ्यांसाठी इतिहासकालीन दागिने पुन्हा एकदा नव्याने उपलब्ध करून देते.

Web Title: Popular Marathi actress meet bollywood superstar govinda actress shares photo