Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केला बाळासोबतचा फोटो, पोस्ट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 13:37 IST2022-12-21T13:36:20+5:302022-12-21T13:37:36+5:30
पूजा सोशल मीडियावरही सक्रिय असते. आता तिचा एका बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोण आहे ते बाळ असा प्रश्न पडला असेल.

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केला बाळासोबतचा फोटो, पोस्ट करत म्हणाली...
Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. २०१० साली क्षणभर विश्रांती (Kshanbhar Vishranti) या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दगडी चाळ (Dagadi Chawl), लपाछपी (Lapachhapi) या सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. पूजा सोशल मीडियावरही सक्रिय असते. आता तिचा एका बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोण आहे ते बाळ असा प्रश्न पडला असेल तर ही पोस्ट बघा.
पूजाने स्वत:च इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने एका गोंडस बाळाला घेतले आहे. 'हॅपी बर्थडे पूजा मावशी तुझ्यावर खूप प्रेम करते' असे कॅप्शन तिने दिले आहे. तर हे बाळ अभिनेता गश्मीर महाजनीचे आहे. गश्मीर महाजनीला ३ वर्षांचा मुलगा आहे ज्याचे नाव 'व्योम' आहे. व्योम अगदी काही महिन्यांचा असतानाचे फोटो पूजा ने शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पूजा ही गश्मीरच्या कुटुंबाच्या फार जवळ असल्याचे य़ातून दिसून येते.
पूजा सावंतचा नुकताच दगडी चाळ २ हा चित्रपट रिलीज झाला. अंकुश चौधरी सोबतच्या या सिनेमात पूजा मुख्य भुमिकेत होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.