"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:39 IST2025-10-07T16:37:27+5:302025-10-07T16:39:00+5:30
"शाहरुख खानचा 'दीवाना' रिलीज व्हायच्या आधी आम्ही...", निवेदिता सराफ यांनी सांगितला किस्सा

"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
मराठीतील दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ खूपच अॅक्टिव्ह आहेत. अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता यांनीही मराठी सिनेसृष्टी गाजवली आहे. 'अशी ही बनवाबनवी', 'धुम धडाका', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. शिवाय हिंदी सिनेमातही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. जॅकी श्ऱॉफ आणि शाहरुख खानसोबतही त्यांनी काम केलं आहे. याचाच अनुभव त्यांनी नुकताच शेअर केला.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत निवेदिता सराफ म्हणाल्या, "शाहरुख खानचा 'दीवाना' रिलीज व्हायच्या आधी आम्ही 'किंग अंकल'चं शूटिंग केलं होतं. दीवाना रिलीज झाला तेव्हा तो स्टार बनला. पण त्याच्यासोबत किंग अंकलमध्ये काम करण्याचा खूपच छान अनुभव होता. तो इतका स्क्रिप्टमध्ये बुडालेला असायचा की चेष्टा मस्करी असं काहीही करायचा नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "जॅकी श्रॉफ आणि मी मस्त मराठीत गप्पा मारायचो. तेव्हा नुकतंच मी अनिकेतला जन्म दिला होता. त्यामुळे मी त्यालाही सेटवर घेऊन जायचे. तेव्हा जॅकीनेही त्याच्या मुलाला टायगर श्रॉफला आणलं होतं. कारण टायगरही तेव्हा छोटासा होता. आमची मुलं लहानच होती मस्त खेळायची. किंग अंकलचं शूट करताना खूपच मजा आली होती."
'किंग अंकल' १९९३ मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये निवेदिता सरा, जॅकी श्रॉफ आणि शाहरुख खान हे बहीण भाऊ होते. निवेदिता सराफ नुकत्याच 'बिन लग्नाची गोष्ट' या मराठी सिनेमात दिसल्या. शिवाय त्या युट्यूबवरही अॅक्टिव्ह असतात. तसंच त्यांची 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिकाही सुरु होती.