अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान, निवेदिता यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर काढला खास फोटो, म्हणाल्या- "आता देशाचा अभिमान.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:18 IST2025-05-30T10:16:28+5:302025-05-30T10:18:00+5:30

निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासोबत खास फोटोशूट केलं. याशिवाय पद्मश्री मिळाल्यावर अशोक सराफ यांचा खास शब्दगौरव केला

nivedita saraf take photo with Padma Shri ashok saraf and write special caption | अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान, निवेदिता यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर काढला खास फोटो, म्हणाल्या- "आता देशाचा अभिमान.."

अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान, निवेदिता यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर काढला खास फोटो, म्हणाल्या- "आता देशाचा अभिमान.."

अशोक सराफ (ashok saraf) यांना काहीच दिवसांपूर्वी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा पद्मश्री देऊन गौरव करण्यात आला. या खास क्षणी अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ उपस्थित होत्या. निवेदिता (nivedita saraf) यांनी पद्मश्री मिळाल्यावर अशोक सराफ यांच्यासोबत राष्ट्रपती भवनाच्या बाहेर खास फोटो काढला. याशिवाय अशोक सराफ यांचं कौतुकही केलं. काय म्हणाल्या निवेदिता?

निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ 

निवेदिता यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर फोटो काढून त्याखाली खास कॅप्शन लिहिलंय. त्या म्हणतात, "हा क्षण शब्दात मांडता येणार नाही असा… तुझा प्रत्येक प्रवास, प्रत्येक टप्पा साक्षी आहे तुझ्या मेहनतीचा, तुझ्या समर्पणाचा. माझ्या आयुष्यातला हिरो, आता देशाचाही अभिमान! माझा अभिमान अनंत पटीने वाढला!! खूप खूप अभिनंदन." अशा शब्दात निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट लिहून कौतुक केलंय. 


अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान

२७ मे रोजी अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत. "पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहातील उपस्थितांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. 

Web Title: nivedita saraf take photo with Padma Shri ashok saraf and write special caption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.