"एकाच दिवशी एवढे सिनेमे रिलीज करणं मला चुकीचं वाटतं!"; निवेदिता सराफ स्पष्टच म्हणाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:01 IST2025-09-15T18:00:31+5:302025-09-15T18:01:01+5:30

एकाच दिवशी अनेक सिनेमे रिलीज करणं बरोबर की चूक? याविषयी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांचं मत स्पष्टपणे व्यक्त केलंय

Nivedita Saraf clearly said about many marathi movies released same day bin lagnachi gosht dashavtar | "एकाच दिवशी एवढे सिनेमे रिलीज करणं मला चुकीचं वाटतं!"; निवेदिता सराफ स्पष्टच म्हणाल्या

"एकाच दिवशी एवढे सिनेमे रिलीज करणं मला चुकीचं वाटतं!"; निवेदिता सराफ स्पष्टच म्हणाल्या

अभिनेत्री निवेदिता सराफ या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. निवेदिता यांनी आपल्या कारकीर्दीत विविध सिनेमा, मालिका, नाटकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मन जिंकलंय. निवेदिता यांची भूमिका असलेला 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. या सिनेमात निवेदिता यांनी साकारलेल्या भूमिकेचं चांगलंच कौतुक होतंय. अशातच एकाच दिवशी 'बिन लग्नाची गोष्ट'सोबतच 'दशावतार', 'आरपार' हे दोन मराठी सिनेमे रिलीज झाले आहेत. तिन्ही मराठी सिनेमे चांगले असून त्यात लोकप्रिय कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान एकाच दिवशी अनेक सिनेमे रिलीज होणं, बरोबर की चूक याविषयी निवेदिता सराफ यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय.

एकाच दिवशी अनेक सिनेमे रिलीज होतात, तर...

नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी मनातील भावना स्पष्टपणे सांगितल्या. त्या म्हणाल्या की, ''आता आपण एकाच दिवशी ८ - ९ मराठी सिनेमे रिलीज होताना बघतोय. प्रिया (प्रिया बापट) म्हणाली होती की, रविवारी पुण्यात नाटकाचे सहा प्रयोग होते. सहाही प्रयोग हाउसफुल्ल. लोक नाटकासाठी बाहेर पडत आहेत, त्यामुळे सिनेमासाठीही त्यांनी बाहेर पडावं. त्यामुळेच एकाच दिवशी एवढे सिनेमे रिलीज होणं मला वैयक्तिकरित्या चुकीचं वाटतं. ऑलरेडी सध्या पिक्चर चालत नाहीयेत. त्यामुळे तुम्ही पर्सनली एकमेकांशी बोललं पाहिजे. आपण निर्माते म्हणून एकत्र नाही आहोत. जे एकत्र येऊन करण्याची गरज आहे.'' 




अशाप्रकारे निवेदिता सराफ यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. १२ सप्टेंबर २०२५ ला एकत्र तीन सिनेमे रिलीज झाले आहेत. तिन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही प्रेक्षकसंख्या विभागली गेली असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच निवेदिता सराफ यांनी सिनेमांचं नाव घेतलं नसलं तरीही सध्याच्या स्थितीला त्यांचं म्हणणं योग्य आहे, असं अनेकांचं मत आहे. निवेदिता सराफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, त्यांची भूमिका असलेली 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका चांगलीच गाजली. नुकतंच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. निवेदिता यांची भूमिका असलेला 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या प्रतिसादात सुरु आहे.

Web Title: Nivedita Saraf clearly said about many marathi movies released same day bin lagnachi gosht dashavtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.