ती आली, डान्स केला अन्...; मराठी अभिनेत्रीची लग्नमंडपात रॉयल एन्ट्री, शाही विवाहसोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:38 IST2025-01-03T09:37:43+5:302025-01-03T09:38:27+5:30
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लग्नमंडपात रॉयल एन्ट्री, शाही विवाहसोहळ्यातील व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

ती आली, डान्स केला अन्...; मराठी अभिनेत्रीची लग्नमंडपात रॉयल एन्ट्री, शाही विवाहसोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल
नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. नवरा माझा नवसाचा २ फेम हेमल इंगळे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. हेमलने नवीन वर्षासोबतच बॉयफ्रेंडसोबत संसार थाटत तिच्या आयुष्याचीही नवीन सुरुवात केली आहे. गुरुवारी(२ जानेवारी) हेमलने रौनक चोरडियासोबत सात फेरे घेतले. हेमलच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
हेमलच्या शाहीविवाहसोहळ्यातील एका व्हिडिओने मात्र लक्ष वेधून घेतलं आहे. हेमलने लग्नमंडपात घेतलेल्या रॉयल एन्ट्रीची सर्वत्र चर्चा आहे. "आफरीन आफरीन" या गाण्यावर डान्स करत हेमलने लग्नात खास ब्रायडल एन्ट्री घेतली. हेमलच्या या एन्ट्रीने उपस्थितांचे डोळेही पाणावले. अभिनेत्रीच्या लग्नातील या भावुक करणाऱ्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आयुष्यातील या खास क्षणासाठी हेमलने गुलाबी रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. तर रौनकने शरवानी आणि फेटा असा पेहराव केला होता. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सात फेरे घेत हेमल आणि रौनकने त्यांचे आशीर्वाद घेतले.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हेमल आणि रोनकने साखरपुडा केला होता. आता लग्नाच्या बेडीत अकडून ते नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. हेमलने काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. अशी ही आशिकी, नवरा माझा नवसाचा २ या सिनेमांमध्ये ती दिसली होती.