"व्यवसायाने सीए, आवड म्हणून अभिनेता आहेस, अन्.."; 'मुळशी पॅटर्न'मधील 'वकीला'साठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:20 IST2025-06-17T13:18:14+5:302025-06-17T13:20:26+5:30

प्रवीण तरडेंनी त्यांचा खास मित्र आणि मराठी अभिनेता सुनील अभ्यंकरसाठी खास पोस्ट लिहिली आहे, जी चर्चेत आहे

mulshi pattern actor pravin tarde birthday post for marathi actor sunil abhyankar | "व्यवसायाने सीए, आवड म्हणून अभिनेता आहेस, अन्.."; 'मुळशी पॅटर्न'मधील 'वकीला'साठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट

"व्यवसायाने सीए, आवड म्हणून अभिनेता आहेस, अन्.."; 'मुळशी पॅटर्न'मधील 'वकीला'साठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट

अभिनेते प्रवीण तरडे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. प्रवीण तरडे यांचे मराठी मनोरंजन विश्वात अनेक मित्र आहेत. प्रवीण त्यांच्या जिगरी मित्रांवर अक्षरशः जीव ओवाळून टाकतात. प्रवीण तरडे यांच्या अशाच एका जिगरी मित्राचा आज वाढदिवस आहे. त्यांचं नाव सुनील अभ्यंकर. 'मुळशी पॅटर्न' सिनेमात सुनील यांनी साकारलेली वकीलाची भूमिका चांगलीच गाजली. प्रवीण यांनी सुनीलला शुभेच्छा देताना खास पोस्ट लिहिली आहे.

प्रवीणची 'वकीला'साठी खास पोस्ट

प्रवीण तरडे सुनील यांच्यासोबत फोटो पोस्ट करुन लिहितात, "राया वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.. तु व्यवसायाने सीए आहेस , आवड म्हणुन अभिनेता आहेस आणि तुला सवड मिळेल तसे काही मित्र पण हॅन्डेल करतोस.. माझं नशिब की त्या काहीजणात मी आहे.. खरंतर त्या काहीजणात मीच मला धरलंय कारण तुझ्या भरवशावर राहीलो तर तोंडघशी पडेल.. त्यामुळे ईतर काहीजण जे त्यांना तुझे मित्र समजतात त्या सगळ्यांनी रायाला फोन करून आपापले स्टेटस तपासून घ्यावे .. तत्पूर्वी तुला पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा."


प्रवीण तरडे दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव', 'मुळशी पॅटर्न' या सिनेमांमध्ये सुनील अभ्यंकर यांनी काम केलंय. याशिवाय 'फुलवंती', 'चि व चि.सौ.का', 'अनन्या', 'अवताराची गोष्ट', 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' अशा सिनेमांमध्ये सुनील यांनी काम केलंय. प्रवीण आणि सुनील यांची अनेक वर्षांपासून मैत्री आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' सिनेमात सुनील यांनी साकारलेली वकीलाची भूमिका खूप गाजली. प्रवीण तरडे यांनी सुनील अभ्यंकर यांना खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: mulshi pattern actor pravin tarde birthday post for marathi actor sunil abhyankar