'तू माझ्यापेक्षा मोठी स्टार आहेस?'; वर्षा उसगांवकरांना 'ही' चूक पडली महागात, मिथूनदाने केली कानउघडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:36 AM2024-02-16T11:36:22+5:302024-02-16T11:37:26+5:30

Varsha usgoankar: वर्षा उसगांवकर यांनी त्या घटनेनंतर चांगलाच धडा मिळाला, असं त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं.

mithun-chakraborty-yelled-at-varsha-usgoankar-for-coming-late-on- | 'तू माझ्यापेक्षा मोठी स्टार आहेस?'; वर्षा उसगांवकरांना 'ही' चूक पडली महागात, मिथूनदाने केली कानउघडणी

'तू माझ्यापेक्षा मोठी स्टार आहेस?'; वर्षा उसगांवकरांना 'ही' चूक पडली महागात, मिथूनदाने केली कानउघडणी

मराठी कलाविश्वातील बिनधास्त आणि विचारांनी बोल्ड असलेली अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर (varsha usgaonkar). मराठीसह त्यांनी अनेक बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे त्यांनी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली. यात एका सिनेमात त्यांनी बॉलिवूडचा डिस्को डान्सर अर्थात मिथून चक्रवर्ती (mithun chakraborty)यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. मात्र, या सिनेमाच्या शूटदरम्यान असा काही किस्सा घडला ज्यामुळे सगळ्यांसमोर मिथूनदाने त्यांची कानउघडणी केली.

अलिकडेच वर्षा उसगांवकर यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमधील अनेक किस्से सांगितले. यामध्येच एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्याकडून एक चूक झाली. ज्यामुळे चारचौघात मिथून चक्रवर्ती त्यांना ओरडले होते.

काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?

"ज्यावेळी मी विमानाने प्रवास करायचे त्यावेळी मी माझा बोर्डिंग पास ड्रायव्हरकडे देऊन त्याला पुढे जायला सांगायचे. त्यानंतर मी मागून जायचे. एकदा एका सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी असंच झालं.  मी ड्रायव्हरला बोर्डिंग पास घेऊन पुढे पाठवलं आणि मी माझ्या बहिणीसोबत हॉटेलवर झोपले होते. जेव्हा अलार्म वाजला त्यावेळी बहिणीने तो बंद केला. ज्यावेळी जाग आली त्यावेळी खूप उशीर झाला होता. कसंबसं करत मी धावत विमानतळावर गेले.आणि, एअरपोर्टवर असलेल्या निर्मात्यांची माफी मागितली. त्यानंतर निर्मात्यांच्या तिकिटावर मी शुटिंगसाठी पुढे गेले. मात्र, तिकडे गेल्यावर मिथून यांनी मला चांगलंच फैलावर घेतलं," असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या.

काय म्हणाले होते मिथून चक्रवर्ती?

 ''तू समजतेस कोण स्वतःला? स्टार समजतेस? तू माझ्यापेक्षा मोठी स्टार आहेस? काय झालं काय? मी तुला किती फोन केले. तू फोनचा आवज कमी करून झोपतेस? समजतेस काय तू स्वतःला? बघ मी एवढा मोठा स्टार असूनही मी स्वतः जातो एअरपोर्टवर. कधीच ड्रायव्हरला पाठवत नाही. यानंतर तू स्वतः जाशील. स्वतः तिकीट घेशील. चार-चार अलार्म लावशील, झोपणार नाहीस. हा धडा आहे तुझ्यासाठी. फ्लाइट मिस करतेस. या सगळ्यासाठी पैसे लागतात. ९ वाजताची शिफ्ट होती. तू आता येतेयस १२ वाजता तयार होऊन व्हीआयपी सारखं. आधी माझ्याशी गोड बोलणाऱ्या मिथुनच तेव्हा जमदग्नीचा अवतार मी पाहिला",  असं म्हणत वर्षा यांनी मिथून दाने कशी त्यांची शाळा घेतली हे सांगितलं.

Web Title: mithun-chakraborty-yelled-at-varsha-usgoankar-for-coming-late-on-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.