हात मोडला तरी शब्द पाळला! केदार शिंदेंसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, 'झापुक झुपूक' सिनेमात दिसणार महत्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:15 IST2025-04-04T17:13:01+5:302025-04-04T17:15:09+5:30

मिलिंद गवळी 'झापुक झुपूक' सिनेमात पंजाबराव ही भूमिका साकारत आहेत. तर केदार शिंदेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मिलिंग गवळींनी सोशल मीडियावर केदार शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

milind gawali to play important role in kedar shinde zapuk zupuk movie shared post | हात मोडला तरी शब्द पाळला! केदार शिंदेंसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, 'झापुक झुपूक' सिनेमात दिसणार महत्वाच्या भूमिकेत

हात मोडला तरी शब्द पाळला! केदार शिंदेंसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, 'झापुक झुपूक' सिनेमात दिसणार महत्वाच्या भूमिकेत

'झापुक झुपूक'  या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमातून 'बिग बॉस मराठी' विनर आणि रीलस्टार असलेल्या सूरज चव्हाणच्या आयुष्यातील संघर्ष दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात आई कुठे काय करते फेम अभिनेता मिलिंद गवळींची देखील वर्णी लागली आहे. मिलिंद गवळी 'झापुक झुपूक'  सिनेमात पंजाबराव ही भूमिका साकारत आहेत. तर केदार शिंदेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मिलिंग गवळींनी सोशल मीडियावर केदार शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

केदार शिंदेंसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

केदारजी शिंदे आणि माझी अनेक वर्ष मैत्री आहे. पहिल्यांदा केदार यांना मी फिल्म सिटीमध्ये १९९५-९६ ला "असंच पाहिजे नवंनवं" या माझ्या मराठी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भेटलो होतो. केदारजी अंकुश चौधरी यांना भेटायला आले होते. दोघांची अनेक वर्षापासूनची मैत्री आहे. त्यानंतर "मराठा बटालियन" साठी निर्माते वासवानी यांना एक उत्कृष्ट लेखक हवा होता. त्यावेळेला मी केदारजी शिंदे यांना "मराठा बटालियन" चे डायलॉग लिहिण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे मराठा बटालियन या चित्रपटाचे काही सीन्स केदारजींनीच लिहिले आहेत. 

 

मग एकदा "हसा चकटफू" या त्यांच्या मालिकेमध्ये मला निवेदकाची भूमिका त्यांनी दिली होती. या सगळ्या गोष्टींना २९-३० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मधल्या काळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर सुंदर सिनेमे केले, पण आमचा एकत्र काम करायचं कधी योग आला नाही. अचानक माझी "आई कुठे काय करते" ही मालिका संपली आणि केदारजींनी त्यांचा Jio Studio बरोबरचा "झापुक झूपूक" या चित्रपटामध्ये 'पंजाबराव' च्या भूमिकेसाठी मला विचारलं आणि मी एका क्षणाचा विलंब न करता 'हो' म्हणालो. 

केदारजींबरोबर काम करायची माझी अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. अतिशय सुंदर पद्धतीने माझं या चित्रपटामध्ये शूटिंग झालं. आज चित्रपट पूर्ण झाला आहे. 25 एप्रिलला तो रिलीज होणार आहे. चित्रपटाचे प्रमोशन सुरू झालं आहे. माझ्या आयुष्यातला हा पहिलाच चित्रपट ज्याची रिलीज डेट आधीच ठरली होती. तीन महिन्याच्या आत हा चित्रपट पूर्ण होऊन प्रेक्षकांसमोर येतो आहे.  

केदारजींचा हात शूटिंग दरम्यान फ्रॅक्चर झाला. तरीसुद्धा शूटिंगला ब्रेक न देता ठरल्याप्रमाणे त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला. त्यांना शारीरिक वेदना जाणवत होत्या. पण मी शब्द दिला आहे, मग माझा हात मोडला तरी तो शब्द मी पाळणार. वेदना सहन करत एक सुंदर मराठी entertaining चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. आणि हा पिक्चर खूप चालेल अशी माझी खात्री आहे. 


केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या फायनलला सूरज चव्हाणवरील 'झापुक झुपूक' सिनेमाची घोषणा केली होती. आता येत्या २५ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमात सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत आहे. तर मिलिंद गवळी, दिपाली पानसरे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

Web Title: milind gawali to play important role in kedar shinde zapuk zupuk movie shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.