हेमंत ढोमेची बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाला, "तूच माझी ॲक्शन...अन् माझी कट!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 16:51 IST2023-12-29T16:49:28+5:302023-12-29T16:51:01+5:30
हेमंत ढोमेच्या आयुष्यातील खरी 'झिम्मा गर्ल' म्हणजे त्याची पत्नी क्षिती जोग

हेमंत ढोमेची बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाला, "तूच माझी ॲक्शन...अन् माझी कट!"
'झिम्मा' (Jhimma) आणि 'झिम्मा 2' (Jhimma 2) अशी हिट चित्रपट देणारी मराठी जोडी हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि क्षिती जोग (Kshiti Jog) सध्या चर्चेत आहेत. त्यांचा 'झिम्मा 2' हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे. सात बायकांना घेऊन हेमंत ढोमेने अगदी मनोरंजक पण तितकाच प्रभावी सिनेमा बनवला. पण हेमंत ढोमेच्या आयुष्यातील खरी झिम्मा गर्ल म्हणजे त्याची पत्नी क्षिती जोग. हेमंतने क्षितीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
'झिम्मा 2'च्या सेटवरील एका सीनमध्ये क्षितीने क्लॅपबोर्ड धरलेला एक फोटो हेमंत ढोमेने पोस्ट केला आहे. याखाली त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'सांगा तुमची #झिम्मागर्ल, मी आज जे काही काम करतोय, जे काही बरं करू शकतोय त्या सगळ्या मागची सारी उर्जा या फोटोत आहे…जिथुन सुरूवात होते आणि जिथे सारं संपतं… तूच माझी ॲक्शन आणि माझी कट!Love u पाटलीणबाई, for backing me every time! माझी झिम्मा गर्ल!'
हेमंत आणि क्षिती यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. एका मुलाखतीत क्षिती आणि हेमंत यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. 'सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलवेळी त्या दोघांची भेट झाली. त्याआधी हेमंत क्षितीला ओळखत होता. ती त्याच्या एका नाटकाला देखील गेली होते. पण सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलच्या वेळी त्यांची ओळख झाली आणि नंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.