"वास्तव' पासून टेंन्शन सुरू झालं, कारण...", महेश मांजरेकरांनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "लोकांना वाटलं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:26 IST2025-10-30T15:15:58+5:302025-10-30T15:26:34+5:30
महेश मांजरेकरांनी सांगितला 'वास्तव' च्या प्रदर्शनाचा किस्सा, म्हणाले- "लोकांना वाटलं..."

"वास्तव' पासून टेंन्शन सुरू झालं, कारण...", महेश मांजरेकरांनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "लोकांना वाटलं..."
Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २६ वर्ष झाली आहेत. इतक्या वर्षानंतर या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. अंडरवर्ल्डची दुनिया, गुंडगिरीमध्ये गुंतलेला तरुण आणि त्याच्याभोवती फिरणारी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. या चित्रपटात संजय दत्तने साकारलेला रघू भाई आजही सिनेरसिकांच्या लक्षात आहे. मात्र, हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रचंड टेन्शनमध्ये आले होते.एका मुलाखतीत त्यांची चित्रपटाच्या प्रदर्शनाचा किस्सा शेअर केला आहे.
अमोल परचुरेंच्या 'कॅचअप मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकरांनी त्यांचा दिग्दर्शनाचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्यांना पहिल्या सिनेमाच्या रिलीजदरम्यान टेन्शन आलं होतं का असा प्रश्न विचारण्यात आला.त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, आई सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा मला अजिबात टेन्शन नव्हतं. चित्रपट हिट किंवा फ्लॉप हे काय असतं याबद्दल मला माहितच नव्हतं. हा चित्रपट बनवण्यासाठी सगळे पैसे माझे वापरले होते. त्यामुळे ते एक वेगळं टेन्शन होतं. अशावेळी ते एक वेगळं टेन्शन असतं की आपल्या प्रोजेक्टमध्ये कोणीतरी पैसे टाकलेत.तो काय म्हणेल ते टेन्शन नव्हतंच.शिवाय तो चित्रपट कमर्शिअल नव्हता. त्याचबरोबर निर्मात्यांनीही मला याबद्दल काही सांगितलं नाही. त्यामुळे याचं काहीच टेन्शन नव्हंत.
'वास्तव' पासून टेन्शन सुरू झालं, कारण...
या मुलाखतीत वास्तव सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल सांगताना महेश मांजरेकर यांनी सांगितलं की, "वास्तव सिनेमापासून टेन्शन सुरू झालं. हा सिनेमा टप्प्याटप्याने झाला. सिनेमाचं शूट दीड वर्ष बंद होतं. त्यामुळे इंडस्ट्रीतील सगळ्यांनी सांगितंल आता चित्रपट बंद झाला. म्हणजे सिनेमा कसा झाला आमचं आम्हाला माहिती. हा माझा पहिलाच हिंदी कमर्शिअल चित्रपट होता. मला अजूनही आठवतंय. याचा मी पहिलाच शो बोरिवलीच्या एका थिएटरमध्ये बघितला. माझी डेरिंग नव्हती आत जायची. पण, चित्रपट संपल्यानंतर लोकांची रिअॅक्शन बघून बरं वाटलं. मग तिथून मराठा मंदिरला गेलो. तरीही मनात भीती होती आपलं काय चुकलंय का त्यानंतर सहाच्या शोला प्लाझाला आलो. तिथे काही माणसं बोलत होती हा चित्रपट मस्त आहे. म्हटलं फसंल बाबा आपलं...".
त्यानंतर मग ते म्हणाले, "गोरेगावात सिनेमॅक्स नावाचं थिएटर होतं. पण, त्या थिएटरमध्ये मी उभा राहून चित्रपट पाहिला. तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्यावर म्हटलं आता बस्स झालं आता काही टेन्शन नाही. आणि तिथू बाहेर आलो. त्यावेळी तिथे बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आणि तिथे वाळू टाकली होती. मी थिएटरच्या बाहेर आल्यानंतर त्या वाळूत झोपलो होतो. इतकं ते प्रेशर कमी झाल्यासारखं वाटलं. "
