सरवणकरांची होणारी सून! तेजस्विनी लोणारीच्या हातावर सजली समाधान यांच्या नावाची मेहंदी, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:52 IST2025-12-02T10:49:14+5:302025-12-02T10:52:03+5:30
तेजस्विनी लोणारीच्या हातावर रंगली मेहंदी, लवकरच अडकणार लग्नबेडीत

सरवणकरांची होणारी सून! तेजस्विनी लोणारीच्या हातावर सजली समाधान यांच्या नावाची मेहंदी, फोटो आले समोर
Tejaswini Lonari: गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. तर काही कलाकार येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री कोमल कुंभार -गोकुळ दशवंत, स्वानंद केतकर- अक्षता आपटे असे मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तेजस्विनी लोणारी आहे. आता लवकरच ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे.
मराठी सिनेसृ्ष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी लोणारी. अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'दोघांत तिसरा आता सगळं विसरा','गुलदस्ता' यांसारख्या चित्रपटात ती झळकली आहे. अलिकडेच २६ ऑक्टोबर रोजी शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याबरोबर तिचा साखरपुडा पार पडला. नुकताच तेजस्विनीचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. याचे खास फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
तेजस्विनीच्या घरात आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून तिचे जवळचे मित्रमंडळी अभिनेत्रीच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच तिच्या हातावर समाधान सरवणकरांच्या नावाची मेहंदी सजली आहे.