"मराठी सिनेमाची इज्जत काढतात त्यांनी...", अमेय वाघचा रोख नेमका कोणाकडे? प्रेक्षकांना केलं 'हे' आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:20 IST2025-02-07T13:15:10+5:302025-02-07T13:20:33+5:30

हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेला 'फसक्लास दाभाडे' हा मराठी चित्रपट शुक्रवार, २४ जानेवारीपासून सर्वत्र प्रदर्शित झाला.

marathi cinema actor amey wagh reaction on success of fussclass dabhade movie shared video on social media | "मराठी सिनेमाची इज्जत काढतात त्यांनी...", अमेय वाघचा रोख नेमका कोणाकडे? प्रेक्षकांना केलं 'हे' आवाहन 

"मराठी सिनेमाची इज्जत काढतात त्यांनी...", अमेय वाघचा रोख नेमका कोणाकडे? प्रेक्षकांना केलं 'हे' आवाहन 

Amey Wagh On Fussclaas Dabhade Success : हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेला 'फसक्लास दाभाडे' हा मराठी चित्रपट शुक्रवार, २४ जानेवारीपासून सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात दाभाडे कुटुंबाची कहाणी पाहायला मिळते आहे. हेमंत ढोमे (Hemant Dhome) लिखित व दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल. राय आणि क्षिती जोग आहेत.  खदखदून हसवतानाच डोळ्यांची किनार पाणवणारा हा चित्रपट सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रदर्शित होताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हाऊसफूल झाला आहे. याचनिमित्ताने अभिनेता अमेय वाघने (Amey Wagh)सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने 'फसक्लास दाभाडे'च्या प्रेक्षकवर्गाचे आभार मानले आहेत. शिवाय मराठी सिनेमाला कमी लेखनाऱ्यांना चांगलच सुनावलं आहे.


अमेय वाघ याने इन्स्टाग्रामवर बॉक्स ऑफिसवर मराठी प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून त्यांचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुरुवाती अभिनेता म्हणतो, नमस्कार मित्रांनो, आज सकाळी झोपेतून जागा झालो, व्यायाम वगैरे केला आता नाश्ता करायचाय. पण, या सगळ्या दरम्यान, एकच विचार मनात चालू आहे की ज्यांनी फसक्लास दाभाडे बघितला. ज्या लोकांनी त्यांचा अभिप्राय कळवला, ज्या लोकांनी वेळात वेळ काढून सिनेमा पाहिला, त्यांना सिनेमा आवडला असेल नसेल त्या सगळ्यांना थॅक्यू म्हणायचं राहून गेलं होतं, असं मला वाटतं. खरोखर, मी हा व्हिडीओ यासाठी करतोय ज्यांनी आमचा सिनेमा बघितला, म्हणजे ज्यांना आवडला आहे त्यांना थॅक्यू अजूनच म्हणेन. पण, नुसतं तुम्ही वेळ काढून, तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन बघितला असेल तर मनापासून थॅक्यू. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सिनेमाचा तिसरा आठवडा आता सुरु  झाला आहे.

पुढे अमेय वाघने म्हटलं, काही लोकं तक्रार करतात आमच्या इथे शो कमी आहेत. शोज नाहीयेत. काय आहे, दर शुक्रवारी नवीन सिनेमे येत असतात तरीसुद्धा आपला सिनेमा अतिशय उत्तमरित्या चालू आहे. आणि बऱ्याच ठिकाणी बरेच शो चालू आहेत.आता पुन्हा एकदा जाऊन या विकेंडला तुम्ही जाऊन सिनेमा बघितलात तर पुन्हा एकदा आपले शो वाढतात. जसे मागच्या विकेंडला खूप शोज वाढले. तर प्लीज सिनेमा ओटीटीवर येण्याची वाट बघू नका. कारण सिनेमा इतक्यात ओटीटीवर येणार नाही. जे मराठी सिनेमाची इज्जत काढतात त्यांनी तिकिट काढायला हरकत नाही", असं म्हणत अभिनेत्याने ट्रोलर्सना देखील सुनावलं आहे. अमेयने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्याआहेत. 

दरम्यान, फसक्लास दाभाडे हा चित्रपट सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, उषा नाडकर्णी, मिताली मयेकर, राजसी भावे हे कलाकार चित्रपटात आहेत.

Web Title: marathi cinema actor amey wagh reaction on success of fussclass dabhade movie shared video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.