"या वेळेला एकट्याने नाही, आईबरोबर छान साजरा करा...", वडिलांच्या वाढदिवशी तेजस्विनी पंडितची डोळे पाणावणारी पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:24 IST2025-11-28T18:23:22+5:302025-11-28T18:24:29+5:30

तेजस्विनी पंडित वडिलांच्या आठवणीत व्याकूळ, शेअर केली भावुक पोस्ट

marathi actress tejaswini pandit share emotional post for her father says | "या वेळेला एकट्याने नाही, आईबरोबर छान साजरा करा...", वडिलांच्या वाढदिवशी तेजस्विनी पंडितची डोळे पाणावणारी पोस्ट 

"या वेळेला एकट्याने नाही, आईबरोबर छान साजरा करा...", वडिलांच्या वाढदिवशी तेजस्विनी पंडितची डोळे पाणावणारी पोस्ट 

Tejaswini Pandit: मराठी सिनेसृ्ष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते आहे.आजवर तिने विविध धाटणीच्या सिनेमांमधून वैविध्यपू्र्ण भूमिका साकारल्या आहेत. तेजस्विनी पंडितसोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. नुकतीच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

तेजस्विनी पंडित हिचे वडील रणजित पंडित यांचा आज जन्मदिवस.  आज त्यांच्या  वाढदिवसानिमित्त तिने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत म्हटलंय, "ह्यावेळेला एकट्याने नाही, आई बरोबर छान साजरा करा...",तेजस्विनीची ही स्टोरी पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. त्याचबरोबर तिने आई ज्योती चांदेकर आणि वडील रणजीत पंडित यांचा एकत्रित फोटो देखील स्टोरीला शेअर केला आहे. 

वडील हयात असताना स्वतःचं घर झालं नाही, ही खंत तेजस्विनीला नेहमी जाणवत आली. आज मिळवलेलं यश पाहायला वडील असते तर किती छान झालं असतं, हे ती वारंवार सांगत आली आहे. आईच्या निधनानंतर आता दोघांची भेट कुठेतरी झाली असेल आणि ते तिथे आनंदात असतील, अशी आशादेखील तिने व्यक्त केली आहे.

वर्कफ्रंट

अनेक मराठी चित्रपटांत काम केलेली तेजस्विनी हिंदी सिनेमातही झळकली. ओम राऊतच्या 'आदिपुरुष' सिनेमात तिने शृपणखाची भूमिका साकारली होती. तेजस्विनीने 'रानबाजार', 'समांतर', 'अनुराधा' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
अभिनयाबरोबरच तिने नुकतंच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. 

Web Title: marathi actress tejaswini pandit share emotional post for her father says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.