मालिकेतील नायिकेची मोठ्या पडद्यावर एन्ट्री, 'ऊत' सिनेमात साकारणार महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:34 IST2025-10-29T16:33:16+5:302025-10-29T16:34:21+5:30

छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरात सुपरिचित झालेली अभिनेत्री सुपर्णा श्याम  लवकरच 'ऊत’ या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

marathi actress suparna shyam to play important role in ut movie | मालिकेतील नायिकेची मोठ्या पडद्यावर एन्ट्री, 'ऊत' सिनेमात साकारणार महत्त्वाची भूमिका

मालिकेतील नायिकेची मोठ्या पडद्यावर एन्ट्री, 'ऊत' सिनेमात साकारणार महत्त्वाची भूमिका

छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरात सुपरिचित झालेली अभिनेत्री सुपर्णा श्याम  लवकरच 'ऊत’ या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सुपर्णा ‘ऊत’ या चित्रपटात ‘गुलाब’ या कणखर मध्यमवर्गीय गृहिणीच्या व्यतिरेखेत दिसणार आहे. स्वतंत्र विचारसरणीच्या गुलाबचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवताना ‘प्रेम’ व ‘लग्न’ या दोन्ही गोष्टी ती कशारीतीने हाताळते, हे पहायला मिळणार आहे. 

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना सुपर्णा  सांगते, "या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. ही अशा प्रेमाची कथा आहे जी कदाचित आपल्या अवतीभवती देखील असू शकते. प्रेमाला जिंकत आपण ते कसं निभावतो? याची कथा दाखवताना प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही ‘ऊत’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे". 


सुपर्णा सोबत राज मिसाळ, आर्या सावे ही नवी जोडी या चित्रपटात दिसणार आहे. राजकुमार तांगडे, अनिकेत केळकर, प्राजक्ता केळकर, पुरषोत्तम वाघ, शैलेश कोरडे, अर्चना रावल, दीपक पाटील, वैदही  ठाकूर, सिद्धेश्वर थोरात, अभय कुलकर्णी,  श्रेया देशमुख, धनश्री  साटम आदि  कलाकारांच्या सुद्धा यात  भूमिका आहेत.  'ऊत' चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Web Title : सुपर्णा श्याम का बड़े पर्दे पर पदार्पण: 'ऊत' में महत्वपूर्ण भूमिका

Web Summary : 'दुहेरी' से प्रसिद्ध सुपर्णा श्याम 'ऊत' में गुलाब के रूप में अपनी शुरुआत कर रही हैं, जो एक मजबूत, मध्यमवर्गीय गृहिणी हैं। फिल्म प्यार, शादी और रिश्तों के बारे में समाज की धारणा पर उनके विचारों का पता लगाती है। इसमें राज मिसाल और आर्या सावे भी हैं, जो 21 नवंबर को रिलीज हो रही है।

Web Title : Suparna Shyam's Big Screen Debut: A Key Role in 'Oot'

Web Summary : Suparna Shyam, famed from 'Duheri,' debuts in 'Oot' as Gulab, a strong, middle-class housewife. The film explores her views on love, marriage, and society's perception of relationships. It also features Raj Misal and Arya Save, releasing November 21st.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.