पाठमोरा फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का? मराठमोळी असूनही साऊथमध्ये झालीये लोकप्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 17:56 IST2024-02-28T17:56:00+5:302024-02-28T17:56:36+5:30
Marathi actress: अनेक सुपरहिट मराठी सिनेमा दिल्यानंतर या अभिनेत्रीने तिचा मोर्चा साऊथ सिनेमांकडे वळवला आहे.

पाठमोरा फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का? मराठमोळी असूनही साऊथमध्ये झालीये लोकप्रिय
सोशल मीडिया आजच्या काळातील प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे आज या माध्यमातून असंख्य गोष्टी दररोज वाऱ्यासारख्या व्हायरल होत असतात. यात खासकरुन कलाविश्वाशी आणि कलाकारांशी निगडीत गोष्टी तर क्षणार्थात पसरतात. यामध्येच सध्या एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री पाठमोरी उभी असल्यामुळे ती नेमकी कोण? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्री इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पाठमोरी उभी असून तिचा हा फोटो तिच्या नव्या सिनेमातील आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून तिने दाक्षिणात्य कलाविश्वात एन्ट्री घेतली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आहे. सोनालीने नुकताच इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला असून तो Malaikottai Vaaliban या तिच्या मल्याळम सिनेमातील आहे. सोनाली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर आता तिने तिचा मोर्चा दाक्षिणात्य कलाविश्वाकडे वळवला आहे.