Video: एक कटाक्ष अन् मनमोहक हास्य; रिंकूने घातला चाहत्यांच्या मनावर घाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:15 IST2022-04-14T19:15:00+5:302022-04-14T19:15:01+5:30
Rinku rajguru: पहिल्याच चित्रटातून प्रेक्षकांना 'सैराट' करणाऱ्या रिंकूने 'कागर', 'मेकअप' आणि 'झुंड' या चित्रपटातूनही तिच्या अभिनयाची जादू दाखवली.

Video: एक कटाक्ष अन् मनमोहक हास्य; रिंकूने घातला चाहत्यांच्या मनावर घाव
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (rinku rajguru). पहिल्याच चित्रटातून प्रेक्षकांना 'सैराट' करणाऱ्या रिंकूने 'कागर', 'मेकअप' आणि 'झुंड' या चित्रपटातूनही तिच्या अभिनयाची जादू दाखवली. त्यामुळे आज रिंकूचा कलाविश्वात दबदबा असल्याचं पाहायला मिळतो. रिंकूचा गेल्या काळात सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्येच तिने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रिंकूची प्रत्येक पोस्ट चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या साडीत एक फोटोशूट केलं होतं. हे फोटोशूट चांगलंच चर्चेत आलं होतं. त्यानंतर याच साडीवर तिने एक व्हिडीओदेखील शूट केला आहे.
स्मिता पाटील इज बॅक! रिंकू राजगुरुचे साडीतील फोटो पाहताच नेटकऱ्यांना आली दिवंगत अभिनेत्रीची आठवण
रिंकूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती युवा (Yuva) या चित्रपटातील कभी निम निम (Kabhi Neem Neem) या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यात तिने टाकलेला नजरेचा कटाक्ष आणि मनमोहक हास्य यामुळे नेटकरी घायाळ झाले आहेत.
दरम्यान, या व्हिडीओला तासाभरात हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळाले आहेत. तसंच सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे.