गावच्या मातीत हरवून गेली पूजा; धकाधकीच्या आयुष्यात ब्रेक घेत पोहोचली कोकणामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 12:24 IST2023-12-15T12:24:24+5:302023-12-15T12:24:57+5:30

Pooja sawant: पूजा सध्या तिच्या गावी म्हणजेच कोकणात गेली आहे. त्यामुळे येथील सुंदर व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

marathi-actress-pooja-sawant-shared-instagram-story-from-her-village-konkan | गावच्या मातीत हरवून गेली पूजा; धकाधकीच्या आयुष्यात ब्रेक घेत पोहोचली कोकणामध्ये

गावच्या मातीत हरवून गेली पूजा; धकाधकीच्या आयुष्यात ब्रेक घेत पोहोचली कोकणामध्ये

मराठीसह बॉलिवूडमध्येही दमदार अभिनय करुन लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत (pooja sawant). आतापर्यंत अभिनयामुळे चर्चेत येणारी पूजा सध्या तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली. सोबतच कोणासोबत लग्नगाठ बांधणार हे सुद्धा सांगितलं. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये तिच्या पर्सनल लाइफविषयी चर्चा रंगत आहे. या चर्चांमध्येच आता पूजाने तिचं गाव गाठलं आहे. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या पूजा तिच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा ब्रेक घेतला आहे. पूजा सध्या तिच्या गावी म्हणजेच कोकणात गेली आहे. त्यामुळे  गावी गेल्यानंतर ती निवांतपणे राहत असल्याचं दिसून येत आहे. पूजाने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत ती गावी असल्याचं सांगितलं.

पूजाने तिच्या गावचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गावची विहीर, पाठीमागे मस्त प्रशस्त घर दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने “माझं घर, माझं गाव, माझं कोकण”, असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच तिने या व्हिडीओसोबत 'मन उधाण वाऱ्याचे' हे गाणं सुद्धा प्ले केलं आहे.

दरम्यान, पूजा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली.  पूजा पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये लग्नगाठ बांधणार आहे.  सिद्धेश चव्हाण असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे.

Web Title: marathi-actress-pooja-sawant-shared-instagram-story-from-her-village-konkan