वाढलेल्या वजनामुळे पूजा सावंतला मिळालं होतं 'हे' टोपणनाव; वेट लॉस करत केली सगळ्यांची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 16:12 IST2023-07-12T16:05:40+5:302023-07-12T16:12:53+5:30
Pooja sawant: लहान असताना पूजा हेल्दी असल्यामुळे तिला घरातल्यांनी एक खास टोपणनाव दिलं होतं.

वाढलेल्या वजनामुळे पूजा सावंतला मिळालं होतं 'हे' टोपणनाव; वेट लॉस करत केली सगळ्यांची बोलती बंद
प्रत्येक कलाकार स्वत: फिट आणि तंदरुस्त ठेवण्यासाठी जीम, डाएट, योगा यांसारख्या विविध मार्गांचा अवलंब करत असतो. यात खासकरुन अभिनेत्री त्यांच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देतात. बऱ्याचदा एखाद्या अभिनेत्रींचं किंचित वजन वाढलं किंवा तिने लूकमध्ये कोणता बदल केला की लोक त्यांना ट्रोल करायला सुरुवात करतात. असाच एक किस्सा मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिने सांगितला आहे. लहान असताना पूजा हेल्दी असल्यामुळे तिला घरातल्यांनी एक खास टोपणनाव दिलं होतं.
मध्यंतरी पूजाने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिचं टोपणनाव काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी तिने तिचं निकनेम सांगितलं. विशेष तिच्या या नावामागचा किस्सा आणि ते नाव प्रचंड गोड असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं.
पूजाला लहान असताना घरातील लोक बोजा असं म्हणायचे. पूजाचा जन्म वाडिया हॉस्पिटलमध्ये झाला. जन्माच्यावेळी तिचं वजन साडेदहा पाऊंड होतं. विशेष म्हणजे त्या वर्षातील सर्वात हेल्दी बाळ म्हणून तिचा रेकॉर्ड आहे. विशेष म्हणजे जन्मानंतर तिचं वजन वाढतच गेलं. वाढत्या वजनामुळे ती जड झाली होती. म्हणून तिला कोणीही उचलून घ्यायचं नाही. त्यावेळी 'हा काय बोजा आहे, असं माझा मामा आईला म्हणाला होता. तेव्हापासून सगळेच बोजा म्हणायचे. पण,आता ते नाव बोजा वरुन बोजू असं झालं आहे', असं पूजा म्हणाली.
दरम्यान, पूजा सध्या तिच्या फिटनेस फ्रिकपणामुळे चर्चेत येत असते. पूजा क्षणभर विश्रांती, झकास,दगडी चाळ, भेटली तू पुन्हा,लपाछपी पोश्टर बॉईज २ अशा कितीतरी मराठी सिनेमात झळकली आहे. तसंच तिने बॉलिवूडसिनेमांमध्येही काम केलं आहे.