सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' पाहून भारावली मराठमोळी अभिनेत्री; म्हणते- "तुम्ही साउथच्या 'बाहुबली'चं कौतुक केलं असेल तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 12:34 IST2025-01-12T12:30:22+5:302025-01-12T12:34:42+5:30

सध्या मराठी मनोरंजनविश्वात सुबोध भावेच्या (subodh bhave) संगीत मानापमान चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे.

marathi actress navri mile hitlerla fame akshata apte praises subodh bhave sangeet manapman movie shared special post on social media | सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' पाहून भारावली मराठमोळी अभिनेत्री; म्हणते- "तुम्ही साउथच्या 'बाहुबली'चं कौतुक केलं असेल तर..."

सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' पाहून भारावली मराठमोळी अभिनेत्री; म्हणते- "तुम्ही साउथच्या 'बाहुबली'चं कौतुक केलं असेल तर..."

Akshta Apte On Sangeet Manapmaan: सध्या मराठी मनोरंजनविश्वात सुबोध भावेच्या (subodh bhave) 'संगीत मानापमान' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. 'संगीत मानापमान' सिनेमात सुबोध भावेसोबत वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, सुमीत राघवन हे कलाकार आहेत. 'संगीत मानापमान' सिनेमा हा संगीतप्रेमींसाठी जणू एक पर्वणीच आहे. 'संगीत मानापमान' सिनेमातील गाणी, कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींची सिनेरसिकांना पसंतीस उतरत आहेत. कट्यार काळजात घुसलीनंतर सुबोध भावे  'संगीत मानापमान'च्या निमित्ताने दुसऱ्यांदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. दरम्यान, सर्वच क्षेत्रातून या सिनेमावर कौतुकाच वर्षाव करण्यात येत आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सुबोध भावेचा संगीत मानापमान पाहून सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. 

'नवरी मिळे हिटलरला' आणि '३६ गुणी जोडी' या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षता आपटेने सोशल मीडियावर 'संगीत मानापमान' बद्दल पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्रीने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं आवाहन देखील केलं आहे. अक्षताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय की, "जर तुम्ही साउथच्या बाहुबली चित्रपटाचं कौतुक केलं असेल किंवा डिस्नीच्या म्युझिकल मुव्ही जर्नी एन्जॉय केल्या असतील आणि लहाणपणी वाचलेल्या इसापनीतीच्या गोष्टी जर तुम्हाला आठवत असतील तरच तुम्हाला आपल्या मराठीतला संगीत मानापमान तुम्हाला कळेल आणि खूप आवडेल."

पुढे अभिनेत्रीने म्हटलंय, "खूप सुंदर, साधी सोपी गोष्ट... कमाल स्क्रीनप्ले, मराठीमध्ये बहुतेक आजवर कधी न पाहिलेली लोकेशन्स आणि सेट. सुंदर बीजीएम आणि कमाल गाणी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गाण्याची चित्रपटामधील प्लेसमेंट, अप्रतिम दिग्दर्शन, सुंदर शॉट्स... खूप मजा आली!" 

Web Title: marathi actress navri mile hitlerla fame akshata apte praises subodh bhave sangeet manapman movie shared special post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.