Video: मास्तरीणबाईंच्या एव्हरग्रीन सासूबाई; मृणाल कुलकर्णींचं तरुणींना लाजवेल असं सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 16:00 IST2024-05-17T15:59:52+5:302024-05-17T16:00:23+5:30
Mrinal Kulkarni: पांढऱ्या रंगाची कॉटनची साडी नेसून त्यांनी हलकासा मेकअप केला आहे. त्यामुळे या लूकमध्ये त्या सुंदर दिसत आहेत.

Video: मास्तरीणबाईंच्या एव्हरग्रीन सासूबाई; मृणाल कुलकर्णींचं तरुणींना लाजवेल असं सौंदर्य
कधी सोनपरी तर कधी अवंतिका होत प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी (mrinal kulkarni). उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर मृणाल गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्या कायम चर्चेत असतात. सध्या नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या अशाच एका व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
मृणाल कुलकर्णी सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या कायम त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असतात. यात अलिकडेच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या कमालीच्या सुंदर दिसतायेत. पांढऱ्या रंगाची कॉटनची साडी नेसून त्यांनी हलकासा मेकअप केला आहे. सोबतच केसांमध्ये फुलं माळली आहेत आणि मोजकेच दागिने परिधान केले आहेत. त्यामुळे या लूकमध्ये त्या सुंदर दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये मृणाल कमालीच्या सुंदर दिसत असून त्यांचं सौंदर्य एखाद्या २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असं आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्या एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या सासूबाई आहेत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. त्यांच्या सौंदर्याचं आणि फिटनेसची म्हणूनच सध्या चर्चा होतीये.
दरम्यान, मृणाल कुलकर्णी या लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे (shivani rangole) हिच्या सासूबाई आहेत. परंतु, या दोघींचं एकमेकींसोबत सासूसुनेऐवजी मैत्रिणीसारखं नातं आहे. त्यामुळे या दोघींची जोडी कायम चर्चेत येत असते. शिवानी सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. तर, मृणाल कुलकर्णी यांचा छोट्या पडद्यावरचा वावर कमी झाला असून त्यात बऱ्याचदा रुपेरी पडद्यावर झळकतांना दिसतात.