अस्सं सासर सुरेख बाई! मानसी नाईकच्या सासरची मंडळी पाहिलीयेत का? पाहा फॅमिली फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:09 IST2022-03-07T13:09:24+5:302022-03-07T13:09:47+5:30
Manasi naik:मानसी नाईक हे नाव आज सगळ्यांना परिचित आहे. आपल्या नृत्यशैलीमुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मानसीने वाट बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर अशी कितीतरी गाणी सुपरहिट केली आहेत.

अस्सं सासर सुरेख बाई! मानसी नाईकच्या सासरची मंडळी पाहिलीयेत का? पाहा फॅमिली फोटो
'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. आपल्या नृत्यशैली आणि दिलखेचक अदांमुळे मानसीने आज कलाविश्वात तिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. काही महिन्यांपूर्वीच मानसीने प्रदिप खरेरासोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली मानसी अनेकदा तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. विशेष म्हणजे लग्नानंतर येणारे सगळे पहिले सणवार मानसीने मोठ्या थाटात साजरे केले. यावेळचे काही फोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहे. विशेष म्हणजे लग्नाच्यावेळी मानसीने तिच्या आई-वडिलांचे आणि घरातील अन्य सदस्यांचे फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर केले होते. मात्र, यावेळी तिच्या सासरच्या मंडळींचा एक फोटो चर्चेत आला आहे.
मानसीप्रमाणेच तिच्या सासूबाईदेखील सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यामुळे त्या अनेकदा त्यांच्या मुलांसोबतचे, सुनांसोबतचे फोटो शेअर करत असतात. परंतु, यावेळी मानसीने तिच्या सासरचा फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचे सासू-सासरे, दीर-भावजय आणि नवरा प्रदिप खरेरा दिसून येत आहे. सध्या तिचा हा फॅमिली फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, मानसी नाईक हे नाव आज सगळ्यांना परिचित आहे. आपल्या नृत्यशैलीमुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मानसीने वाट बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर अशी कितीतरी गाणी सुपरहिट केली आहेत. तसंच ती 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्येही झळकली आहे.