विक्रांत मेस्सीने केलेलं कौतुक पाहून भारावल्या छाया कदम; म्हणाल्या, "12th fail मधून माझ्यासारख्या कित्येकांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:22 IST2025-01-14T10:19:17+5:302025-01-14T10:22:12+5:30

अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला आहे.

marathi actress chhaya kadam overwhelmed while meets to bollywood actor vikrant massey shared video | विक्रांत मेस्सीने केलेलं कौतुक पाहून भारावल्या छाया कदम; म्हणाल्या, "12th fail मधून माझ्यासारख्या कित्येकांना..."

विक्रांत मेस्सीने केलेलं कौतुक पाहून भारावल्या छाया कदम; म्हणाल्या, "12th fail मधून माझ्यासारख्या कित्येकांना..."

Chhaya Kadam: मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्री गाजवून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे छाया कदम (Chhaya Kadam). आजवर अनेक हिंदी, मराठी चित्रपट तसेच वेब सीरिजमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. शिवाच अलिकडेच 'कान्स फेस्टिव्हल'मुळे देखील सर्वत्र त्यांची चर्चा होती. 'कान्स'मधील त्यांच्या चमकदार कामगिरीमुळे सर्व स्तरातून छाया कदम यांचं कौतुक करण्यात आलं. छाया कदम आपल्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सुद्धा तितिक्याच सक्रिय असल्याच्या पाहायला मिळतात. आपल्या आयुष्यातील घडणाऱ्या गोष्टी किंवा प्रोजेक्ट्सबद्दल त्या माहिती देत असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.


छाया कदम यांनी सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत (vikrant massey) झालेल्या भेटीचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "आताच्या पिढीतला एक कसदार-दर्जेदार नायक आणि '12th fail' मधून माझ्यासारख्या कित्येकांना पुन्हा नव्याने भरारी घेण्याचे आत्मिक बळ देणारा विक्रांत जेव्हा आपल्याला मिठी मारून आपल्या कामाचे तोंडभरून कौतुक करतो, तेव्हा वाटत राहते की आपण असेच फुलपाखरासारखे सगळ्यांना रंग आणि आनंद देत जगत राहावे. थॅंक्यू सो मच विक्रांत...!" अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. 

वर्कफ्रंट

'सैराट', 'झुंड', 'न्यूड'  ते 'लापता लेडीज', 'मडगाव एक्सप्रेस' यांसारख्या चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारुन छाया कदम मनोरंजनविश्वात स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या 'ऑल वी इमॅजन अॅज लाईट' या सिनेमाचं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही स्क्रीनिंग झालं. यासाठी त्यांनी कान्समध्ये हजेरी लावली. यानंतर छाया कदम यांचं खूप कौतुक झालं. 

Web Title: marathi actress chhaya kadam overwhelmed while meets to bollywood actor vikrant massey shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.