मेहनतीचं फळ मिळालं! दिवाळीच्या मुहूर्तावर मराठी अभिनेत्रीचं घरकुल साकार, फोटो शेअर करत दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:56 IST2025-10-23T12:50:40+5:302025-10-23T12:56:02+5:30
Anuja Sathe New House Photos: दिवाळीच्या मुहूर्तावर मराठी अभिनेत्रीचं गृहस्वप्न साकार, फोटो शेअर करत दाखवली झलक, म्हणाली...

मेहनतीचं फळ मिळालं! दिवाळीच्या मुहूर्तावर मराठी अभिनेत्रीचं घरकुल साकार, फोटो शेअर करत दाखवली झलक
Anuja Sathe Buy New House: दिवाळीचा सण म्हणजे चैतन्याचा आणि आनंदाचा असतो. दिवाळीमध्ये अनेकजण नव्या गोष्टी खरेदी करत हा सण आनंदाने साजरा करतात.या दिवसांमध्ये कोणी नवं घर घेतं तर कोणी नवी गाडी घेतं.दरवर्षी कलाकार मंडळी देखील दिवाळीनिमित्त गाडी खरेदी करतात तर काहीजण नवं घर घेताना दिसतात. अशातच मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन घर खरेदी करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. या अभिनेत्रीचं नाव अनुजा साठे आहे.
अभिनेत्री अनुजा साठेने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मुंबईत हक्काचं घर खरेदी केलं आहे. अनुजा साठे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. वेगवेगळ्या मराठी-हिंदी मालिका, वेबसीरिज, चित्रपट तसंच नाटक या माध्यमातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच अनुजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि आपल्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करते. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अनुजाने मुंबईत हक्काचं घर घेतलं असून नुकताच तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
अनुजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन घरात प्रवेश करतानाच्या फोटोंसह त्याचे कागदोपत्री व्यवहार हे सगळे क्षण तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. "October just got better, Happy Diwali...", असं कॅप्शन देत तिने नव्या घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अनुजाचं हे आलिशान घर १४ व्या मजल्यावर आहे. दरम्यान, अभिनेत्रीने नवीन घर खरेदी करताच तिच्यावर अनेक कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री मयूरी देशमुख, तेजस बर्वे तसेच अनेक सेलिब्रिटी मंडळींनी अभिनेत्रीला नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्कफ्रंट
अभिनेत्री अनुजा साठे ही सौरभ गोखलेची पत्नी आहे. २०१३ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. 'लगोरी', 'एक थी बेगम', 'पेशवा बाजीराव', 'परमाणु,- द स्टोरी ऑफ पोखरण' असे चित्रपट सीरिजमध्ये ती झळकली आहे.