'गच्चीचा कोपरा..'; मुसळधार पावसात विराजस-शिवानी झाले रोमॅण्टिक,Video होतोय तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 14:22 IST2023-07-19T14:21:19+5:302023-07-19T14:22:05+5:30
Virajas and shivani:विराजस सोशल मीडियावर सक्रीय असून त्याने शिवानी सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

'गच्चीचा कोपरा..'; मुसळधार पावसात विराजस-शिवानी झाले रोमॅण्टिक,Video होतोय तुफान व्हायरल
मराठी कलाविश्वातील गोड कपल म्हणजे शिवानी रांगोळे (shivani rangole) आणि विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) . काही महिन्यांपूर्वीच या जोडीने मोठ्या थाटात लग्न केलं. त्यामुळे ही जोडी लग्नानंतर सातत्यान चर्चेत येत आहे. बऱ्याचदा हे दोघं एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यावेळीदेखील त्यांनी असाच एक रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केला आहे.
विराजस सोशल मीडियावर सक्रीय असून त्याने शिवानी सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी घराच्या गच्चीवर पावसात भिजण्याच्या मनसोक्त आनंद घेत आहेत. तसंच या व्हिडीओसोबत विराजसने गारवा या गाजलेल्या म्युझिक अल्बममधील गाणं प्ले केलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आणखीनच खास झाला आहे.
"पाऊस पडतोय आणि मागे गारवामधली गाणी वाजत नाहीयेत असं होणं शक्यच नाही! आपल्या या लाडक्या album ला 25 वर्षे पूर्ण होत आहेत हे ऐकल्यावर परत एकदा वाटतं, पुन्हा पावसाला सांगायचे, कुणाला किती थेंब वाटायचे...", असं कॅप्शन विराजसने या व्हिडीओला दिलं आहे. दरम्यान, शिवानी आणि विराजस सातत्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत असतात. सध्या शिवानी 'तुला शिकवीन चांगला धडा' या मालिकेत काम करत आहे. तर, विराजसचा 'व्हिक्टोरिया' हा सिनेमादेखील अलिकडेच प्रदर्शित झाला. इतकंच नाही तर 'सुभेदार' या सिनेमातही तो झळकणार आहे.