"तीन मराठी चित्रपट एकाच वेळी रिलीज झाले, पण..."; अभिनेत्याने 'बिन लग्नाची गोष्ट' पाहून लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:49 IST2025-09-18T13:48:13+5:302025-09-18T13:49:16+5:30

बिन लग्नाची गोष्ट सिनेमा पाहून मराठी अभिनेत्याने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. जाणून घ्या

Marathi actor sanket korlekar wrote a special post after watching Bin Lagnachi Gosht movie | "तीन मराठी चित्रपट एकाच वेळी रिलीज झाले, पण..."; अभिनेत्याने 'बिन लग्नाची गोष्ट' पाहून लिहिली खास पोस्ट

"तीन मराठी चित्रपट एकाच वेळी रिलीज झाले, पण..."; अभिनेत्याने 'बिन लग्नाची गोष्ट' पाहून लिहिली खास पोस्ट

प्रिया बापट-उमेश कामत या दोघांची प्रमुख भूमिका असलेला 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा रिलीज झालाय. हा सिनेमा बघून अभिनेता संकेत कोरलेकरने उमेश कामतला फोन केला. याशिवाय सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली. संकेत लिहितो, ''काल उमा आणि मी “बिन लग्नाची गोष्ट” चित्रपट बघायला गेलो. उमेश कामत आणि प्रिया बापट ला एकत्र सिनेमात काम करताना बघण्याची संधी कोण सोडेल ? प्रत्येक कपलने बघायलाच हवा असा हा चित्रपट.''

''चित्रपटाच्या नावातच सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत पण विषय अत्यंत वेगळा आहे. मुळीच कोणतेच स्पॉयलर्स देणार नाही फक्त एवढच सांगेन की नातं कोणतेही का असेना त्यात कम्युनिकेशन का आणि किती गरजेचं असतं हे तुम्हाला ह्या चित्रपटातून कळेल.तुमची रिलेशनशिप बळकट करण्याची ताकद ह्या चित्रपटात आहे.''


''बिन लग्नाची गोष्ट ह्या चित्रपटात मला उमेश प्रिया म्हणजेच आशय आणि ऋतूची जोडी जितकी आवडली तितकीच निवेदिता सराफ म्हणजेच उमा आणि ऋतूची केमिस्ट्री देखील आवडली. चित्रपटात सोनोग्राफीचा सिन जेव्हा येतो तेव्हा ह्या दोघींची अभिनयाची ताकद तुम्हाला दिसेल आणि शेवटच्या सिन मध्ये जेव्हा उमेश कामत त्याच्या आई वडिलांशी वीडियो कॉल वर बोलतो तेव्हा तो पर्सनली माझा म्हणजे संकेत कोर्लेकरचा एकमेव फेवरेट हिरो का आहे ते कळेल.''

''सुकन्या ताई… तू भाव खाऊन गेलीस.. नातवाचे कळल्यावर जे एक्सप्रेशन दिलेस त्यातून तू किती कमाल आहेस हे लगेच स्पष्ट होतं. लेखन दिग्दर्शन सगळंच कमाल. महाराष्ट्रातील सर्वांना माझा आग्रह आहे की नंतर रिग्रेट करण्यापेक्षा आत्ता सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघा. सगळे तगडे कलाकार एकत्र एका फ्रेम मध्ये फार कमी वेळेस बघायला मिळतात.. माहीत आहे तीन मराठी चित्रपट एकत्र रिलीज झाले आहेत.. सगळे बघा.. पण सुरुवात बिन लग्नाची गोष्ट पासून करा.. उमेश दादा.. काल कॉल वर सुध्दा म्हणालो.. तुझ्यासोबत काम करताना जितकी मजा येते त्याच्या शंभर पट तुला स्क्रीन वर काम करताना बघून येते… lots of love yarr.. maja aali..''

Web Title: Marathi actor sanket korlekar wrote a special post after watching Bin Lagnachi Gosht movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.