संदीप पाठकचं चौकटी कुटुंब पाहिलं का? पाहा त्याचा फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 19:45 IST2022-08-17T19:45:00+5:302022-08-17T19:45:00+5:30

Sandeep pathak: कलाविश्व असो वा समाजातील एखादा मुद्दा संदीप बिंधास्तपणे त्याचं मत सगळ्यांसमोर मांडत असतो.

marathi actor sandeep pathak shared family photo | संदीप पाठकचं चौकटी कुटुंब पाहिलं का? पाहा त्याचा फॅमिली फोटो

संदीप पाठकचं चौकटी कुटुंब पाहिलं का? पाहा त्याचा फॅमिली फोटो

चित्रपट, मालिका, नाटक अशा सर्वच माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला अभिनेता संदीप पाठक (sandeep pathak). उत्तम अभिनयाच्या जोरावर संदीपने कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर उघडपणे व्यक्त होणारा संदीप सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते.

कलाविश्व असो वा समाजातील एखादा मुद्दा संदीप बिंधास्तपणे त्याचं मत सगळ्यांसमोर मांडत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. अलिकडेच संदीपने इन्स्टाग्रामवर एक फॅमिली फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आपल्या कुटुंबाची ओळख करुन दिली.

१५ ऑगस्टचं निमित्त साधत संदीपने सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी, मुलगा आणि धाकटी मुलगी दिसून येत आहे. या चौघांनीही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं.

दरम्यान, संदीप मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. नाटकांपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या संदीपने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. यात 'श्वास', 'एक डाव धोबीपछाड', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'शहाणपण देगा देवा', 'एक हजाराची नोट', 'येड्याची जत्रा', 'देऊळ बंद', 'डबल सीट', 'नटसम्राट', 'बेनवाड', 'ईडक', 'राख' अशा अनेक चित्रपटामधील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत.
 

Web Title: marathi actor sandeep pathak shared family photo