New York च्या रस्त्यावर रितेश-जेनिलिया झाले रोमॅण्टिक; शाहरुखच्या गाण्यावर केला रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 13:05 IST2023-04-02T13:05:06+5:302023-04-02T13:05:56+5:30
Riteish Deshmukh: सध्या रितेश आणि जेनिलिया न्यूयॉर्कमध्ये त्यांचा क्वालिटी टाइम घालवत आहेत. त्यामुळे येथील अनेक व्हिडीओ, फोटो पोस्ट करुन ते चाहत्यांना त्यांचे अपडेट देत आहेत.

New York च्या रस्त्यावर रितेश-जेनिलिया झाले रोमॅण्टिक; शाहरुखच्या गाण्यावर केला रोमान्स
महाराष्ट्राचं लाडक कपल म्हणजे रितेश देशमुख (Ritesh Deshmukh )आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh). कलाविश्वात सक्रीय असलेली ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांची कायम चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे ही जोडी सुद्धा नेटकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. यात खासकरुन जेनिलिया तिचे आणि रितेशचे काही हटके, मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. मात्र, यावेळी रितेशने एक रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केला आहे.
सध्या रितेश आणि जेनिलिया न्यूयॉर्कमध्ये त्यांचा क्वालिटी टाइम घालवत आहेत. त्यामुळे येथील अनेक व्हिडीओ, फोटो पोस्ट करुन ते चाहत्यांना त्यांचे अपडेट देत आहेत. यामध्येच त्यांनी शाहरुख खानच्या (shahrukh khan) 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमातील 'हो गया हैं तुझ को तो प्यार सजना' या गाण्यावर रोमॅण्टिक व्हिडीओ शूट केला आहे.
''London नहीं New York ही सही !!! खुली Bus पे… ये गाना तो बनता है!'', असं कॅप्शन देत रितेशने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
Video: 'रितेश देशमुखने माझी स्टोरी चोरली'; भाऊ कदमने केला आरोप
दरम्यान, रितेशचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून या जोडीला चाहते भरभरुन प्रेम देत आहेत. अलिकडेच रितेशचा 'वेड' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या माध्यमातून जेनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.