"उगाच गेलो गुलकंदच्या प्रीमियरला त्यापेक्षा...; 'गुलकंद' सिनेमाविषयी पृथ्वीकची खास पोस्ट चर्चेत, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 11:23 IST2025-05-01T11:16:25+5:302025-05-01T11:23:06+5:30

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद' चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

marathi actor prithvik pratap praised gulkand movie shared post on social media | "उगाच गेलो गुलकंदच्या प्रीमियरला त्यापेक्षा...; 'गुलकंद' सिनेमाविषयी पृथ्वीकची खास पोस्ट चर्चेत, म्हणाला...

"उगाच गेलो गुलकंदच्या प्रीमियरला त्यापेक्षा...; 'गुलकंद' सिनेमाविषयी पृथ्वीकची खास पोस्ट चर्चेत, म्हणाला...

Prithvik Pratap Post For Gulkand Movie: सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद' चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर (Sai Tamhanakar), समीर चौघुले (Samir Chougule), ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. दरम्यान, 'गुलकंद'ही दोन जोडप्यांची कथा आहे. प्रसाद ओक आणि ईशा डे नवरा बायको आहेत. तर सई आणि समीर चौघुले यांची जोडी आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. अशातच या अभिनेता पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap) या चित्रपटाचं कौतुख करत खास पोस्ट शेअर केली आहे. 


सोशल मीडियावर पृथ्वीक प्रतापने 'गुलकंद' सिनेमाच्या स्टार कास्टसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत अभिनेत्याने लिहिलं आहे की, "उगाच गेलो गुलकंदच्या प्रीमियरला त्यापेक्षा... तिकीट काढून सिनेमागृहात जाऊन फॅमिली सोबत बघायला हवा होता गुलकंद सिनेमा... इतका कमाल सिनेमा बनवलाय यार.. उद्या फॅमिली सोबत परत जावं लागणारे कारण... ईशा डे भाव खाऊन गेलीये.. काय genuine काम केलंय. Star in the making. समीर दादा तू जितका निरागस खऱ्या आयुष्यात आहेस त्यापेक्षा दसपट निरागस mr. ढवळे साकारलायस, मनाला भिडणारा. सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांचे डोळे, त्यातले भाव, कामातली सहजता आणि पात्रांमधली गुंतागुंत यांची खरंतर एक case study असायला हवी. सचिन गोस्वामी फक्त विनोदी शैली नाही तर लव्ह स्टोरीज सुद्धा कायच्या काय ease ने हाताळतात. बऱ्याच सीन्स मध्ये पात्रांना काहीच बोलू न देता इतक बोलतं करणं तसं अवघड काम आहे. 

यानंतर अभिनेत्याने चित्रपटाविषयी म्हटलंय, "पण सचिन आला आणि त्याने मैदान नाही गाजवलं असं क्वचितच होत, किंबहुना होतच नाही. त्यात हि दोन सचिन एकत्र असतील तर फक्त century नाही match सुद्धा जिंकणार यावर शिक्कामोर्तब होतं. सिनेमा खूप जवळचा,खूप भिडणारा आणि निर्मळ प्रेम कसं करावं? हे शिकवणारा एका महत्त्वाच्या माणसामुळे होतो तो म्हणजे ‘सचिन मोटे’. ‘Extra marital affair’ हि आपली संस्कृती नाही’ याच पुरेपूर भान ठेवून त्यांनी हा सिनेमा लिहिलाय. प्रत्येक सिन गणिक situation grow होते आणि गम्मत डबल होते. brownie points to the writer. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे… “प्रेमाच्या बाबतीत GenZ होऊ पाहणाऱ्या Millenials ने तर हा सिनेमा नक्कीच पाहावा.” गुलकंद आजपासून सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे. नक्की पाहा." अशा आशयाची पोस्ट लिहून पृथ्वीक प्रतापने 'गुलकंद' चित्रपटासह त्यातील कलाकाराचं भरभरुन कौतुक केलं आहे. 

Web Title: marathi actor prithvik pratap praised gulkand movie shared post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.