'धर्मवीर' सिनेमातील बाळासाहेब ठाकरे यांचा लूक आला समोर, जाणून घ्या कोण साकारतंय त्यांची भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 20:13 IST2022-04-25T14:12:22+5:302022-04-25T20:13:24+5:30
धर्मवीर सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालंय. यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण अभिनेता साकारतंय हेदेखील समोर आलंय.

'धर्मवीर' सिनेमातील बाळासाहेब ठाकरे यांचा लूक आला समोर, जाणून घ्या कोण साकारतंय त्यांची भूमिका!
'जनसामान्यांचा नेता नाही तर, जनसामान्यांचा आधार' अशी किर्ती मिळवणारे दिवंगत लोकनेते म्हणजे आनंद दिघे. सर्वसामान्यांचे प्रश्न कळकळीने सोडवण्यासाठी आनंद दिघे यांनी त्यांचं आयुष्य खर्ची घातलं. त्यामुळेच त्यांचा हा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे.
गुरु शिष्या नात्यावर आधारित 'गुरूपौर्णिमा' गाण्यात आनंद दिघे बाळासाहेबा ठाकरे यांचं पाद्यपूजन करताना दिसतायेत. भेटला विठ्ठल असं या गाण्याचे बोल आहेत. या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका अभिनेता मकरंद पाध्ये साकारणार आहेत. मकरंदचा बाळासाहेबा ठाकरेंचा लूक या गाण्यातून समोर आला आहे. आनंद दिघे बाळासाहेबांना आपला गुरु मानत होते. त्यांच्या आयुष्यात बाळा साहेबांचं स्थान खूप महत्त्वाचं होतं. या गाण्याच्या सुरुवातील आनंद दिघे एकनाथ शिंदेने गुरु पौर्णिमा हा गुरुचा नाही तर शिष्याचा दिवस असल्याचं सांगताना दिसतायेत. या गाण्याचं शब्द आणि चाल दोन्ही मनाल भिडणार आहे. विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे.
"देऊळ बंद" , "मुळशी पॅटर्न" यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी "सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटानंतर "धर्मवीर" चित्रपटाचे शिवधनुष्य उचलण्याचे कामं प्रविण विठ्ठल तरडे (Pravin Tarde)ने केलं आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन दोनही गोष्ट त्यांचं केल्यात.
माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा ! आनंद दिघे आज लौकिक अर्थाने हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात ते आजही जिवंत आहेत. दरम्यान, हा चित्रपट येत्या १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धर्मवीर मु.पो. ठाणे' असं या चित्रपटाचं नाव आहे.