वाढलेली दाढी, लांब केस अन् डोळ्यावर चष्मा; मराठी अभिनेत्याची झाली अशी अवस्था, ओळखताही येईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:49 IST2025-12-16T16:06:09+5:302025-12-16T16:49:16+5:30
लांब दाढी, वाढलेले केस, डोळ्यावर चष्मा आणि कपाळावर कुकुंवाचा टिळा असा अभिनेत्याचा लूक पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून अभिनेत्याला ओळखणंही कठीण झालं आहे.

वाढलेली दाढी, लांब केस अन् डोळ्यावर चष्मा; मराठी अभिनेत्याची झाली अशी अवस्था, ओळखताही येईना
एका मराठी अभिनेत्याचा फोटो सध्या व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये अभिनेत्याने धोतर आणि कुर्ता घातल्याचं दिसत आहे. लांब दाढी, वाढलेले केस, डोळ्यावर चष्मा आणि कपाळावर कुकुंवाचा टिळा असा अभिनेत्याचा लूक पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून अभिनेत्याला ओळखणंही कठीण झालं आहे.
फोटोत दिसणारा हा अभिनेता म्हणजे आरोह वेलणकर आहे. आरोहने त्याच्या एका वेब सीरिजसाठी हा खास लूक केला आहे. 'केसरिया १००' या वेब सीरिजमधून आरोह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेबसीरिजमध्ये त्याने माधव सदाशिव गोवळकर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या वेबसीरिजमधील हा लूक शेअर करत तो म्हणतो, "स्वतःपासून थोडं दूर जाऊन इतिहासात शिरण्याचा, स्वतःच्या नसलेल्या श्रद्धा स्वीकारण्याचा, मौन, ठाम विश्वास, विरोधाभास आणि खोलपणा हे सगळं एका फ्रेममध्ये वाहून नेण्याचा... अभिनेता असण्याचा आनंद यातच दडलेला असतो. वेशभूषा फिकी पडते, मेकअप निघून जातो; पण जे उरतं ते म्हणजे क्षणभर का होईना, दुसरं आयुष्य जगल्याचं समाधान. तुम्ही वेब सीरिज पाहिली का?".
आरोह हा मराठीतील लोकप्रिय अभिनेता. रेगे या सिनेमामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. 'लाडाची मी लेक गं', 'एक राधा एक मीरा' या मालिकांमध्ये तो झळकला. बिग बॉस मराठीमध्येही तो सहभागी झाला होता. तर घंटा, फनरल, हॉस्टेल डेज, सविता दामोदर परांजपे यांसारख्या सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे.