'एआयच्या गावात. माझा असा लूक..'; AI केलेला फोटो पाहून महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 12:13 IST2023-08-06T12:12:22+5:302023-08-06T12:13:01+5:30
Mahesh manjrekar: तुम्ही पाहिला का एआयने महेश मांजरेकरांचा फोटो कसा तयार केलाय ते?

'एआयच्या गावात. माझा असा लूक..'; AI केलेला फोटो पाहून महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून एआय म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कलाविश्वासह राजकीय व्यक्तींपर्यंत अनेक दिग्गजांचे फोटो एडिट करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर एआयच्या मदतीने तयार झालेले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आतपर्यंत बॉलिवूड ते मराठी कलाकारांपर्यंत अनेकांचे फोटो एआयने तयार केले आहेत. यामध्येच नुकताच दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांचा फोटो तयार करण्यात आला. हा फोटो पाहिल्यावर त्यांनी भन्नाट कमेंट केली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो एआयने तयार केला आहे. या फोटोमध्ये मांजरेकर जबरदस्त लूकमध्ये दिसत असून त्यांनी त्या फोटोला कॅप्शनही तसंच दिलं आहे. “एआयच्या गावात. माझा असा लूक असावा, अशी माझी इच्छा होती. सर्व खलनायकांची भागमभाग.” @haxanabdullah‘तू सॉलिड आहेस’, कॅप्शन देत महेश मांजरेकर यांनी त्यांना झालेला आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, महेश मांजरेकरांचा हा फोटो पाहून अमृता खानविलकरपासून अमृता देशमुखपर्यंत अनेक कलाकारांनी त्यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. अलिकडेच मांजरेकरांची एका काळेचे मणी ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. त्यापूर्वी ते बटरफ्लाय सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.