लाडक्या भावासाठी अभिनेता रितेश देशमुख उतरला प्रचाराच्या रिंगणात; म्हणतो- "माझं मत फक्त..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 10:00 IST2024-11-11T09:56:52+5:302024-11-11T10:00:19+5:30
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे.

लाडक्या भावासाठी अभिनेता रितेश देशमुख उतरला प्रचाराच्या रिंगणात; म्हणतो- "माझं मत फक्त..."
Riteish Deshmukh: विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या नऊ-दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यानंतर दिवाळीनंतर संथ गतीने सुरू असलेल्या प्रचाराला गती मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अशातच या विधानसभा निवडणूकीसाठी विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र अमित आणि धिरज देशमुख यांनी अर्ज केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेता रितेश देशमुखने ( Riteish Deshmukh) केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर रितेशने धीरज देशमुख यांच्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या दोन्ही भावांसाठी आता रितेश देशमुख पुढे सरसावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रितेश धिरज यांना पाठिंबा देण्यासाठी प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. "धिरज विलासराव देशमुख यांना माझं मत आहे". असं कॅप्शन देत अभिनेत्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
रितेशने अद्याप राजकारणात एन्ट्री घेतलेली नसली तर तो कायम आपल्या दोन्ही भावांना साथ देत आला आहे. यंदा लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार धिरज देशमुख यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.