'धकधक गर्ल'ला पडली अजय-अतुलच्या गाण्याची भुरळ; 'वाजले की बारा'वर केला जबरदस्त डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 10:57 IST2024-05-01T10:56:24+5:302024-05-01T10:57:04+5:30
Madhuri dixit: माधुरीने ठसकेबाजपणे 'वाजले की बारा'वर डान्स केला आहे.

'धकधक गर्ल'ला पडली अजय-अतुलच्या गाण्याची भुरळ; 'वाजले की बारा'वर केला जबरदस्त डान्स
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (madhuri dixit) कायमच तिच्या नृत्यकौशल्यामुळे चर्चेत येत असते. आजवर तिच्यावर चित्रीत झालेली अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्यामुळे तिच्या नृत्यकौशल्याची भूरळ प्रेक्षकांवर कायमच असल्याचं पाहायला मिळते. परंतु, सध्या माधुरीला अजय-अतुल यांच्या गाण्याची भुरळ पडल्याचं दिसून येत आहे. नटरंगमधील वाजले की बारा या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केला आहे.
सध्या सोशल मीडियावर माधुरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती 'वाजले की बारी' या गाण्यावर अफलातून डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ बॉलिवूड कलाकारांमध्येही लोकप्रिय होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ डान्स दीवानेची स्पर्धक वैष्णवी पाटील हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वैष्णवीने माधुरीसोबत 'वाजले की बारा' या गाण्यावर ताल धरला. यावेळी माधुरीने पोपटी रंगाची वेस्टर्न टच असलेली डिझायनर साडी नेसली होती. सोबतच नाकात नथ, हलका मेकअप आणि साजेशी हेअरस्टाइल केली होती.