भव्य विजय...! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंची पुन्हा बाजी, हेमंत ढोमेची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 17:59 IST2024-06-04T17:58:28+5:302024-06-04T17:59:15+5:30
Lok Sabha Election Result 2024: अमोल कोल्हेंचा विजय निश्चित झाल्यानंतर मराठी अभिनेता हेमंत ढोमेने ट्वीट केलं आहे. हेमंत ढोमेने ट्वीटमधून अमोल कोल्हेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

भव्य विजय...! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंची पुन्हा बाजी, हेमंत ढोमेची खास पोस्ट
Loksabha Election Result 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. देशात आणि राज्यात कोण बाजी मारणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिरूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्यात लढत झाली. शिरूरमधून पुन्हा एकदा अमोल कोल्हेंच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे.
अमोल कोल्हेंचा विजय निश्चित झाल्यानंतर मराठी अभिनेता हेमंत ढोमेने ट्वीट केलं आहे. हेमंत ढोमेने ट्वीटमधून अमोल कोल्हेंना शुभेच्छा दिल्या आहेत. "आमचे मित्र आणि आमच्या शिरूर मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार मा. अमोल कोल्हे यांचा भव्य विजय…खूप खूप अभिनंदन! आपण आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा गाजवाल ही खात्री आहे… असेच काम करत रहा, मनःपुर्वक शुभेच्छा!" असं हेमंत ढोमेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आमचे मित्र आणि आमच्या शिरूर मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार मा. अमोल कोल्हे यांचा भव्य विजय…
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 4, 2024
खूप खूप अभिनंदन!
आपण आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा गाजवाल ही खात्री आहे… असेच काम करत रहा, मनःपुर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/ZFq4zTqhVq
पहिल्या फेरीपासून कोल्हे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. ही लढत चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु जशा फेऱ्या होत गेल्या त्याप्रमाणे एकतर्फीच आघाडी दिसून आली आहे.२१व्या फेरीअंती अमोल कोल्हेंनी १ लाख १४ हजार ८५५ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील यांची लोकप्रियता पाहता शिरूरमध्ये आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु सध्याच्या आकडेवारीवरून आढळराव आघाडी घेणे अशक्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच अमोल कोल्हेंचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.