सबसे कातिल गौतमी पाटीलच आयटम साँग रिलीज, बोल्ड अदांनी चाहत्यांना केलं घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 12:46 IST2023-08-31T12:38:54+5:302023-08-31T12:46:00+5:30
गाणं समोर येता तरुणाई पुन्हा एकदा गैतमीच्या तालावर नाचताना दिसत आहे.

Lavani Dancer Gautami Patil
खान्देश कन्या लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या रुपावर आणि नृत्यावर अख्खा महाराष्ट्र फिदा झालेला आहे. तरुणाईमध्ये तर तिचे प्रचंड वेड आहे. गावागावात सध्या तिच्या कार्यक्रमांना भरघोस गर्दी होत आहे. नुकतेच तिचं "माझा कारभार सोपा नसतोय र" हे नवं गाणं समोर आलं आहे. यात गौतमीचा कातिल अंदाज बघायला मिळत आहे. सबसे कातिल गौतमी पाटील अशा कमेंट्स चाहते करताना दिसत आहे.
गाणं समोर येता तरुणाई पुन्हा एकदा गैतमीच्या तालावर नाचताना दिसत आहे. गैतमीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या गाण्याची एक छोटी झलक शेअर केली आहे.
डान्सर गौतमी पाटील आता अभिनेत्री झालीये. तिच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. 'घुंगरू' असं गौतमीच्या पहिल्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचे शूटिंग सोलापूर, मढ, हंपीसह परदेशातदेखील झालं आहे. या सिनेमात गौतमी बाबा गायकवाडसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.