दिवंगत मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या लेकाला पाहिलंय? साखरपुड्याचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:42 IST2026-03-17T12:36:52+5:302026-03-17T12:42:43+5:30

आजही दर्दी रसिकांना आनंद अभ्यंकर यांची हटकून आठवण येते. आनंद अभ्यंकर यांचा मुलगा नीरजचा साखरपुडा झाला.

Late actor Anand Abhyankar son neeraj abhyankar engagement photos viral | दिवंगत मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या लेकाला पाहिलंय? साखरपुड्याचे फोटो आले समोर

दिवंगत मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या लेकाला पाहिलंय? साखरपुड्याचे फोटो आले समोर

मराठी सिनेसृष्टीत एका अभिनेत्याच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. हा अभिनेता म्हणजे आनंद अभ्यंकर. एका अपघातात आनंद अभ्यंकर यांचा मृत्यू झाला आणि सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं. आजही दर्दी रसिकांना आनंद अभ्यंकर यांची हटकून आठवण येते. आनंद अभ्यंकर यांचा मुलगा नीरजचा साखरपुडा झाला. नीरजच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्वांनी नीरजचं अभिनंदन केलं आहे.

नीरजने त्याची गर्लफ्रेंड अनुष्का तारफेसोबत साखरपुडा केलाय. नीरज आणि अनुष्काच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्वांनी या दोघांचं अभिनंदन केलंय. नीरज सुद्धा मनोरंजन विश्वात सक्रीय असून त्याने विविध म्यूझिक व्हिडीओमध्ये आपली कला सादर केली आहे. नीरजच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करताच इंडस्ट्रीतील कलाकारांनी आणि आनंद अभ्यंकर यांच्या चाहत्यांनी नीरज आणि अनुष्काचं अभिनंदन केलंय आणि भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.




आनंद अभ्यंकर आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या भूमिकांनी ते अजरामर आहे. दुनियादारी सिनेमात त्यांनी साकारलेली प्राचार्यांची भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय 'असंभव', 'मातीच्या चुली', 'मला सासू हवी', 'अवघाची संसार' या मालिका, सिनेमांमधून त्यांनी काम केलंय. आनंद यांचा लेक नीरज वडिलांचा वारसा पुढे चालवत आहे. आज जाणकार रसिकांना आनंद अभ्यंकर यांच्या सदाबदार अभिनयाची कमी जाणवल्याशिवाय राहत नाही.

Web Title : दिवंगत मराठी अभिनेता आनंद अभ्यंकर के बेटे नीरज ने की सगाई

Web Summary : मराठी अभिनेता आनंद अभ्यंकर के बेटे नीरज ने अनुष्का तारफे से सगाई कर ली। सगाई की तस्वीरें वायरल हो गई हैं, प्रशंसकों और उद्योग के सहयोगियों ने बधाई दी। नीरज मनोरंजन उद्योग में सक्रिय हैं, संगीत वीडियो के माध्यम से अपने पिता की विरासत को आगे बढ़ा रहे हैं।

Web Title : Anand Abhyankar's son, Neeraj, gets engaged; engagement photos surface.

Web Summary : Late actor Anand Abhyankar's son, Neeraj, recently got engaged to Anushka Tarfe. Photos of the ceremony have gone viral, with fans and industry colleagues offering their congratulations. Neeraj is active in the entertainment industry, continuing his father's legacy through music videos.