"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:56 IST2025-06-09T12:54:00+5:302025-06-09T12:56:51+5:30

महेश मांजरेकर आणि केदार शिंदे यांच्याबद्दल क्रांती रेडकर म्हणाली...

kranti redkar reveals mahesh manjrekar cut her whole role in a movie says but i leant a lot | "महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?

"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?

क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जत्रामधील 'कोंबडी पळाली' गाण्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. क्रांतीने खूप कमी वयातच अभिनयात करिअर करायला सुरुवात केली होती. 'माझा नवरा तुझी बायको', 'फक्त लढ म्हणा', 'जत्रा', 'करार', 'फूल ३ धमाल' अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित गाजलेल्या 'लालबाग परळ' सिनेमातही ती दिसणार होती. मात्र मांजरेकरांनी तिचा अख्खा रोलच कापल्याचा तिने नुकताच खुलासा केला.

'मिरची मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत क्रांती रेडकरने केदार शिंदे आणि महेश मांजरेकर यांच्याकडून ती काय काय शिकली याबद्दल सांगितले. क्रांती म्हणाली, "जितका कमी अभिनय कराल तितकं जास्त कनेक्ट होईल हे मी महेश मांजरेकरांकडून शिकले. ते दिग्दर्शक म्हणून खूप कमाल आहेत. ते तुमच्यात कलाकार म्हणून खूप सुधारणा करतात. मी त्यांच्याबरोबर एक सिनेमा केलेला तो म्हणजे लालबाग परळ. त्यात त्यांनी माझा अख्खा रोल कापला. ते म्हणाले की, 'मी तुझा एक सीन कापेन. मग पाच सीनपैकी एक सीन गेला. तीन सीनसाठी मला तुला वाया घालवायचं नाही. तसाही तो ट्रॅक बनत नाहीए. त्यामुळे मी रोलच कापतोय. मी म्हटलं, 'ओके, काहीच प्रॉब्लेम नाही'. कारण माझ्यासाठी त्या सिनेमात काम करणं म्हणजे अभिनयाचं शिक्षण घेण्यासारखंच होतं. तेही मोफत. उलट मलाच पैसे मिळाले. त्यामुळे मला वाटलं की चालेल, मी तसंही ती प्रोसेस खूप एन्जॉय करत होते. त्यामुळे मला केदर शिंदे आणि महेश मांजरेकरांसोबत काम करायला मिळणं हे एखाद्या अभिनय प्रशिक्षणासारखंच वाटलं."

ती पुढे म्हणाली, "तसंच कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग साधणं मी केदारकडून शिकले. फापटपसारा म्हणजे कॉमेडी करणं नव्हे. तुझा पंच तेवढा तिथेट लँड झाला पाहिले. क्लीन कॉमेडी कर, नंतर त्यात बदल करुन का असं तो म्हणायचा. त्यामुळे श्रीमंत दामोदर पंत हे या क्लीन कॉमेडीचं योग्य उदाहरण आहे. दिग्दर्शक म्हणून तुमचा एका सिनेमात, नाटकात कसा सहभाग असला पाहिजे हे मला शिकायला मिळालं."

Web Title: kranti redkar reveals mahesh manjrekar cut her whole role in a movie says but i leant a lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.