"इथे घरचे काम देत नाहीत तर..."; केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, इंडस्ट्री सोडून ड्रायव्हिंग करण्याची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 09:06 IST2026-02-04T09:04:04+5:302026-02-04T09:06:42+5:30

केदार शिंदेंचे भाऊ सुद्धा एकेकाळी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वात सक्रीय होते. त्यांचं नाव मंदार शिंदे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. काय म्हणाले?

Kedar Shinde's brother Mandar Shinde big revelation about marathi industry | "इथे घरचे काम देत नाहीत तर..."; केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, इंडस्ट्री सोडून ड्रायव्हिंग करण्याची आली वेळ

"इथे घरचे काम देत नाहीत तर..."; केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, इंडस्ट्री सोडून ड्रायव्हिंग करण्याची आली वेळ

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. याच केदार शिंदेंचे भाऊ सुद्धा एकेकाळी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वात सक्रीय होते. त्यांचं नाव मंदार शिंदे. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मंदार यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की आज त्यांच्यावर ड्रायव्हिंग करण्याची वेळ आली आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. काय म्हणाले?

केदार यांच्याविषयी काय म्हणाले मंदार शिंदे?

मंदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आणि केदार यांचे भाऊ आहेत. मंदार शिंदे म्हणाले, ''मी जर चांगला दिग्दर्शक नसतो तर इतक्या मालिका मी स्वतः दिग्दर्शित केल्या, ज्या चॅनलला टेलिकास्ट होत होत्या. TRP उच्च होते, ते श्रेय फक्त कलाकारांचं आहे? त्या कॅमेराच्या मागचा दिग्दर्शक नव्हता? रागही येतो पण सांगायचं कोणाला? मी सध्या एका व्यापाराकडे ड्रायव्हिंगचा जॉब करतो. सुरुवातीला थोडं वाईट वाटलं पण मला माझं घर चालवायचं आहे. मला करावं लागलं.''




''नशीब जसं तुम्हाला टोकावर नेत असतं आणि अचानक एका टोकावरुन तुम्हाला खाली पाडतं. त्या दरम्यान केदार दादाला एक मालिका मिळाली. काय करतोयस? ये, शूटिंगला असं ते म्हणाले. माझं तिथे काम होतं, कपडे आणि चपला न्यायच्या कलाकारांच्या आणि ते त्यांना द्यायच्या. १०० रुपये मिळायचे. पुढे मला स्वतःला एक चित्रपट दिग्दर्शित करायची संधी मिळाली आणि थोडीशी नाराजी झाली. अचानक मला कळलं नाही की ४-५ दिवसांनी तो चित्रपट निर्मात्याने का उतरवला. तिथून मग माझं काम पूर्णपणे बंद झालं.''

''आपल्या इंडस्ट्रीला आजही हा शाप आहे की, कंपू आहेत. कलाकार कितीही हुशारीचा असला, चांगलं काम करत असला तरीही त्याला द्यायचं नाही. म्हणजे इथे घरातूनच काम मिळत नाही तर बाहेरच्यांकडे काय मागू?'', असा भावुक खुलासा मंदार शिंदेंनी केला.

Web Title : केदार शिंदे के भाई मंदार का खुलासा; ड्राइविंग करने पर मजबूर।

Web Summary : निर्देशक केदार शिंदे के भाई मंदार शिंदे ने बताया कि उद्योग में संघर्ष के कारण वह ड्राइविंग कर रहे हैं। सफल शो का निर्देशन करने के बावजूद, काम मिलना बंद हो गया। उन्होंने भाई-भतीजावाद का हवाला देते हुए कहा कि प्रतिभा अवसर की गारंटी नहीं देती।

Web Title : Kedar Shinde's Brother Mandar Reveals Struggle; Forced to Drive.

Web Summary : Mandar Shinde, brother of director Kedar Shinde, revealed he's driving due to industry struggles. Despite directing successful shows, work dried up. He cited favoritism, saying talent doesn't guarantee opportunity, even within families, forcing him to seek alternative employment.