सख्ख्या मावशीच्या 'त्या' वक्तव्यानंतर केदार शिंदेंची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाले, "असुरक्षितता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 11:57 IST2025-05-26T11:56:45+5:302025-05-26T11:57:11+5:30
घरातील वाद चव्हाट्यावर, केदार शिंदेंच्या मावशीने जाहीरपणे व्यक्त केली नाराजी

सख्ख्या मावशीच्या 'त्या' वक्तव्यानंतर केदार शिंदेंची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाले, "असुरक्षितता..."
मराठी दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत. शाहीर साबळे यांची कन्या चारुशीला साबळे (Charusheela Sable) या नृत्यांगना आणि अभिनेत्रीही आहेत. केदार शिंदेंच्या त्या सख्ख्या मावशी आहेत. इतकी वर्ष केदार शिंदें इंडस्ट्रीत आहेत. एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे, मालिका आणि नाटकही त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. मात्र एकाही प्रोजेक्टमध्ये त्यांनी आपल्या मावशीला घेतलं नाही अशी खंत चारुशीला यांनी नुकती बोलून दाखवली. मावशीच्या त्या वक्तव्यानंतर केदार शिंदेंनी सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदे यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टचा अर्थ असा की, "पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुमचा पाय खाली खेचायचा प्रयत्न करेल तेव्हा लक्षात ठेवा की आत्मविश्वास हा कधीही शांत असतो तर असुरक्षिततेच्या भावनेचाच जास्त आवाज असतो." केदार शिंदेंचा अप्रत्यक्षरित्या मावशी चारुशीला यांच्यावरच रोख असल्याचं दिसून येतं.
"केदारने इतरांचा उद्धार केला पण मला कधीच काम दिलं नाही, " मावशी चारुशीला साबळेंची खंत
चारुशीला साबळे या केदार शिंदेंच्या मावशी आहेत. 'अश्विनी ये ना' या गाजलेल्या गाण्यात त्या अशोक सराफ यांच्यासोबत झळकल्या होत्या. केदार शिंदे आणि त्यांच्यात फक्त १५ वर्षांचं अंतर आहे. 'लोकधारा'च्या माध्यमातून त्यांनी अनेक मुलांना शिकवण्याचं काम केलं. त्यातच भाचा केदार शिंदेही होते. चारुशीला साबळे यांनी 'प्रियतमा','मी सिंधुताई सपकाळ','गाव तसं चांगलं','लक्ष्मीची पावले','गंमत जम्मत' या मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.'गंमत जम्मत' मध्येच 'अश्विनी ये ना' हे गाणं होतं जे आजही लोकप्रिय आहे.