"खरं सांगू, आता थांबायला हवं..." दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 10:58 IST2023-09-08T10:57:25+5:302023-09-08T10:58:09+5:30
एक लांबलचक सुट्टी घेतोय...

"खरं सांगू, आता थांबायला हवं..." दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत
'बाईपण भारी देवा' मराठी सिनेमाने तुफान यश मिळवलं. आधी 'महाराष्ट्र शाहीर' आणि नंतर 'बाईपण भारी देवा' असे बॅक टू बॅक हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे. एक लांबलचक सुट्टी घेतोय असं म्हणत त्यांनी सध्यातरी इन्स्टाग्रामवरुन ब्रेक घेतला आहे. सोशल मीडियाचा अतिवापर झाल्यावर कुठेतरी डिटॉक्स होण्याचीही गरज असते. हे ओळखून केदार शिंदेंनी इन्स्टाग्रामवरुन ब्रेक घेतलाय.
केदार शिंदेंची पोस्ट
नमस्कार..एक लांबलचक सुट्टी घेतोय या Instagram वरुन..तुमचं प्रेम आजपर्यंत मिळालं पण, खरं सांगू? कुठेतरी थांबायला हवं नव्या विचारांसाठी...
केदार शिंदेंनी अचानक अशी पोस्ट केल्याने सगळेच निराश झाले. त्यांचा पुढचा सिनेमा कोणता असणार याबाबत चाहते उत्सुक होते. बाईपणच्या यशानंतर ते सोशल मीडियावर खूपच सक्रिय असायचे. पण आता इन्स्टाग्रामवरुन काही काळासाठी त्यांनी ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे. नवीन कल्पना सुचावी आणि लक्ष विचलित होऊ नये यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं दिसतंय. आता त्यांच्या नवीन प्रोजेक्टसाठी चाहत्यांना वाट बघावी लागणार आहे.