'तमाशा लाईव्ह'मध्ये सोनाली कुलकर्णी दिसणार या भूमिकेत, लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 03:47 PM2022-06-18T15:47:38+5:302022-06-18T15:48:33+5:30

Sonalee Kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी संजय जाधव यांच्या आगामी 'तमाशा लाईव्ह' या संगीतमय चित्रपटात तिच्या अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

In this role, Sonalee Kulkarni will be seen in 'Tamasha Live' | 'तमाशा लाईव्ह'मध्ये सोनाली कुलकर्णी दिसणार या भूमिकेत, लूक आला समोर

'तमाशा लाईव्ह'मध्ये सोनाली कुलकर्णी दिसणार या भूमिकेत, लूक आला समोर

googlenewsNext

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) संजय जाधव यांच्या आगामी 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) या संगीतमय चित्रपटात तिच्या अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. उत्कंठा कायम ठेवण्यासाठी नुकतेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील 'शेफाली' या सोनाली कुलकर्णीच्या पात्राचा लूक प्रदर्शित करण्यात आला. संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा सांगीतिक नजराणा येत्या १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचे संगीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. 

सोनाली कुलकर्णी हिने तमाशा लाईव्ह चित्रपटातील तिचा लूक शेअर करत लिहिले की, ह्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्युज घेऊन आलीये शेफाली.
'तमाशा LIVE' १५ जुलै पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. या लूकमध्ये सोनाली कुलकर्णी ब्लेझरमध्ये दिसते आहे. सोनालीच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘तमाशा लाईव्ह’ची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केला असून सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची आहे. तर या चित्रपटाला अरविंद जगताप यांचे संवाद लाभले असून कथा विस्तार किरण यज्ञोपवित यांनी केला आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटातील गाण्यांना क्षितीज पटवर्धन यांनी बोल दिले आहेत. ‘तमाशा लाईव्ह’मघ्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: In this role, Sonalee Kulkarni will be seen in 'Tamasha Live'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.