कर्नाटकात कोणताही सिनेमा पाहता येणार २०० रुपयांत, फडणवीस आणि अजित पवारांना टॅग करत अभिनेता म्हणाला...
By कोमल खांबे | Updated: March 8, 2025 09:23 IST2025-03-08T09:23:26+5:302025-03-08T09:23:53+5:30
कर्नाटकात आता कोणताही सिनेमा कुठल्याही थिएटरमध्ये फक्त २०० रुपयांमध्ये पाहता येणार आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचं मराठी अभिनेता हेमंत ढोमेने कौतुक केलं आहे. हेमंत ढोमेने ट्वीट करत राज्य सरकारलाही मराठी सिनेमांबाबत अशा प्रकारचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

कर्नाटकात कोणताही सिनेमा पाहता येणार २०० रुपयांत, फडणवीस आणि अजित पवारांना टॅग करत अभिनेता म्हणाला...
कितीही आवड असली तरीही सर्वसामान्यांना थिएटरमध्ये प्रत्येक वेळेस सिनेमा पाहणं शक्य होतंच असं नाही. संपूर्ण कुटुंबीयांसह थिएटरमध्ये सिनेमा पाहायचं म्हटलं की खिशाला मोठी कात्री बसते. त्यात सिनेमांच्या तिकिटाचे दरही अनेकदा जास्त असतात. नुकतंच याबाबत कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील सर्व सिंगल स्क्रीन आणि मल्टीप्लेक्समधील तिकिटाचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार कर्नाटकात आता कोणताही सिनेमा कुठल्याही थिएटरमध्ये फक्त २०० रुपयांमध्ये पाहता येणार आहे.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचं मराठी अभिनेता हेमंत ढोमेने कौतुक केलं आहे. हेमंत ढोमेने ट्वीट करत राज्य सरकारलाही मराठी सिनेमांबाबत अशा प्रकारचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे. या ट्वीटमध्ये त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केलं आहे.
हेमंत ढोमेचं ट्वीट
कर्नाटक सरकार चा ऐतिहासिक निर्णय!
कर्नाटक या आपल्या शेजारच्या राज्याने आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे!
सर्वच्या सर्व सिनेमागृहात चित्रपटाच्या तिकिटांची किंमत ही जास्तीत जास्त २०० रुपये इतकी मर्यादित असणार!
आपल्या भाषेतला चित्रपट मोठा व्हावा यासाठी उचलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि संपूर्ण देशाला मार्गदर्शक असं पाऊल ठरणार आहे!
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आपल्या दोघांकडून अशाच निर्णयाची अपेक्षा मी एक प्रेक्षक म्हणून सगळ्यात आधी करतो आणि त्या नंतर मराठी भाषा आणि आपल्या भाषेतील चित्रपटांच्या भवितव्या करिता सिनेमागृहांच्या मनमानी कारभाराला आपण आळा घालाल हिच इच्छा!
महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्क्रीन्स उपलब्ध होणं त्यांना प्राईम टाईम मिळणं यासाठी आता कायदा करण्यात यावा! महाराष्ट्रात मराठीलाच प्राघान्य हवं!
शिवाय महाराष्ट्रात सगळ्याच चॅनल्स आणि OTT प्लेटफार्मस ची कार्यालयं आहेत, तर कर्नाटक सरकार सारखं आपणही त्या सर्वांना मराठीला प्राधान्य देणे अनिवार्य करावे ही विनंती!
मला खात्री आहे आपलं सरकार मराठी साठी, मराठी चित्रपट व्यवसायासाठी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचलेल!
कर्नाटक सरकार चा ऐतिहासिक निर्णय!
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) March 7, 2025
कर्नाटक या आपल्या शेजारच्या राज्याने आज एक अत्यंत महत्तवाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे!
सर्वच्या सर्व सिनेमागृहात चित्रपटाच्या तिकिटांची किंमत ही जास्तीत जास्त २०० रुपये इतकी मर्यादित असणार!
आपल्या भाषेतला चित्रपट मोठा व्हावा यासाठी उचलेलं… pic.twitter.com/v6TqfcXYUc
हेमंत ढोमे हा एक अभिनेता असण्याबरोबरच उत्तम दिग्दर्शकही आहे. त्याने 'झिम्मा', 'बघतोस काय मुजरा कर', 'सनी', 'फसक्लास दाभाडे' यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. हेमंत ढोमे आजूबाजूच्या घडामोडींबाबतही सोशल मीडियावरुन त्याचं मत कायमच व्यक्त करताना दिसतो.